प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक | Pregnancy checkups by doctors in Marathi

प्रेग्नन्सी म्हटलं कि हेअल्थ चेकअप्स आलेच .आपल्याला असं वाटतं कि बापरे आता कितीवेळा सुया टोचवून घ्यायच्या किंवा ब्लड टेस्ट कधी असेल नक्की ??पुढची sonography कधी येईल ??मला बाळ हलताना कधी दिसेल ??त्याची heartbeat पहिल्यांदा कधी ऐकेन आणि बरंच काही आपल्या मनात येत असतं.घाबरू नका हे सगळे प्रेग्नन्सी चेकअप्स आनंददायी देखील असतात.माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान आम्ही सोनोग्राफीची आतुरतेने वाट पाहायचो .तेव्हा तुम्हाला देखील तशीच उत्सुकता वाटत असेल .त्यामुळेच ह्या ब्लॉग मध्ये मी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे गरोदरपणात कोणत्या तपासणी करतात ??आणि कधी करतात ह्याच timetable शेअर करत आहे .त्याचबरोबर त्या प्रत्येक प्रेग्नन्सी चेकअप ची माहिती तुम्हाला सांगत आहे .तेव्हा नक्कीच वाचा हे पोस्ट .माझी खात्री आहे कि तुम्हाला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये मिळतील .चला पाहुयात pregnancy checkup कोणत्या ??

प्रेग्नन्सी दरम्यान तुमच्या गर्भाची म्हणजेच होणाऱ्या बाळाची पोटात नीट वाढ होत्यें का? ह्याची time to time तपासणी केली जाते. ह्यातील काही टेस्ट्सना screening tests असंदेखील म्हणतात. प्रेग्नन्सीमधील ह्या टेस्ट्स तुमच्या गर्भाची योग्य वाढ होत्ये ना? ह्याची चाचणी करतात. त्यामुळेच त्यांची नीट माहिती करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे साधारण ज्या common tests आहेत त्यांची माहिती देत आहे.

What u find in this post?

This post talks about common tests performed in pregnancy during span of nine months in india by doctors. It gives details about which test is performed in which month??and what type of pregnancy test it will be?? The post focuses on pregnancy checkups in marathi .It talks about ‘garodarpanatil tapasani ‘ or ‘pregnancy chekups in marathi’.


गर्भधारणेनंतर पहिल्या 8 आठवड्यापर्यंत | During first eight weeks of pregnancy

 • Urine pregnancy testयुरीन प्रेग्नन्सी टेस्ट (UPT) :सर्वप्रथम डॉक्टर visit साठी गेल्यावर तुम्हाला दिवस गेले असल्याचे confirm करण्यासाठी युरीन प्रेग्नन्सी टेस्ट ही डॉक्टरांकडील किटवर घेतली जाते. व दिवस राहिले असल्यास तुमचा case paper बनवला जातो. ह्यात तुमची माहिती, नाव पत्त्यासकट medical history मेंशन करतात.
 • Sonography (ultrasound test)सोनोग्राफी :ही तपासणी साधारण 8 ते 14 आठवड्यापर्यंत होऊ शकते पण माझी पहिल्या 8 आठवड्यामध्येच झाली होती.
  • ह्यात गर्भधारणेची खात्री म्हणजे योग्य ठिकाणी गर्भ रुजलाय व प्रेग्नन्सी ही ectopic प्रेग्नन्सी नाही ना? ह्याची खात्री होते.
  • एकापेक्षा जास्त प्रेग्नन्सीदेखील असू शकतात. जसं की जूळं, तीळं वैगरे. तेव्हा प्रेग्नन्सी single आहे कि multiple ह्याची खात्री होते.
 • Blood test-रक्त तपासणी :ह्यात रक्तगट (blood group test)तपासणी, हिमोग्लोबीन टेस्ट, थायरॉईड टेस्ट, लघवी तपासणी अशा तपासण्यादेखील होतात.

Ectopic pregnancy :ह्यात गर्भ हा गर्भाशयाच्या बाहेर रुजतो. जे धोक्याचे असते.


11 ते 14 आठवड्यादरम्यान | During 11th to 14th weeks of pregnancy

:ह्या कालावधी दरम्यान down syndrome (मतिमंद गर्भ )नसल्याचे खात्री करु घेण्यासाठीच्या screening test चा सामावेश असतो.

 • Sonography (ultrasound test)-सोनोग्राफी :11 ते 14 आठवड्यादरम्यान केल्या जाणाऱ्या ह्या सोनोग्राफीस अनिवार्य महत्व असून NT Scan(Nuchal translusancy) असं देखील म्हणतात. ह्यात गर्भाच्या मानेमागील तरळ पदार्थाची लांबी( Nuchal translusancy ), नाकाच्या हाडाचा उंचवटा(nasal bone), रक्तप्रवाह (Ductous Venosus flow)ह्याची तपासणी होते ज्यावरून down syndrome indicate होऊ शकतो. ही सोनोग्राफी महत्वाची असल्याने एखाद्या तज्ज्ञ व्यक्ती कडून करण्याचे डॉक्टर recommend करु शकतात.
 • Blood test -रक्त तपासणी :ह्यात double marker screening test ( डबल मार्कर ), HBsAg अशा इतर तपासण्या होतात. ह्यातील double marker ही तपासणी down syndrome शी निगडित आहे.

17 ते 19 आठवडे | 17 to 19 th week of pregnancy

 • Anamoly scan(ultrasound test)-सोनोग्राफी :ह्यात गर्भात व्यंग नसल्याची पडताळणी केली जाते म्हणून ह्यास anamoly scan असंदेखील म्हणतात. ही सर्वात महत्वाची सोनोग्राफी असून डॉक्टर तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून ही सोनोग्राफी recommend करतील.गर्भाची योग्य पद्धतीने वाढ होतं असून त्याचे अवयव, हृदय, डोके, नाळ हया सर्व गोष्टींची खात्री केली जाते.
 • ह्याचा व्यतिरिक्त triple marker(ट्रिपल मार्कर )test, Amniocentesis(गर्भजल तपासणी ) ही invasive test डॉक्टर आवश्यकतेनुसार त्यांना गरज वाटल्यासच सांगतात.

28 ते 30 आठवडे

:हया दरम्यान रक्त व लघवी तपासणी (blood and urine test)केल्या जातात. ह्यात हिमोग्लोबीन, रक्तातील साखर (blood sugar test), थायरॉईड (thyroid test) अशा चाचण्या आवश्यकतेनुसार डॉक्टर करु शकतात.


35 ते 38 आठवडे | 35 to 38 weeks of pregnancy

 • Sonography (ultrasound test)-सोनोग्राफी: बाळाची होणारी वाढ, गर्भस्थिती, वजन ह्याची पडताळणी होते. ही देखील नवव्या महिन्यातील शेवटची सोनोग्राफी महत्वाची असते.
 • NST :बाळाच्या हृदयाची गती व नियमितपणा तपासण्यास ह्याची मदत होते.

40 आठवडा | 40 th week of pregnancy

ह्यात प्रसव वेदना चालु करण्यासाठीच्या तपासण्या होतात. तशी वेळ आली तर प्रसव वेदना आपोआप चालु होतील म्हणजे तुम्ही labour मध्ये कधी जाल का प्रसव वेदना induce कराव्या लागतील. व अशा पद्धतीने induce केल्या नंतर तुमचे नॉर्मल होण्याचे chances किती ह्याचा एक आढावा डॉक्टर्स हया खालील tests द्वारे घेतात.

 • गर्भाशयमुख तपासणी
 • Bishop स्कोर

सोनोग्राफी टेस्टची संख्या ही थोडीफार बदलू शकते. पण वर नमूद केलेल्या सोनोग्राफी हया महत्वाच्या असल्याने सर्वांच्या होतातच. दुसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी पोटावरून असल्याने प्रश्न येतं नाही. पण काही वेळा internal checkup असेल तर त्या पद्धतीचे dressup करुन जाणे तुम्हास सोपे जाईल. शक्यतो सगळ्या टेस्टस ना आई वडील दोघांची उपस्थिती महत्वाची आहे. तुमच्या होणाऱ्या बाळाची, तुमच्या creation ची ही पहिली पाऊले आहेत. तर दोघांनीही ती एन्जॉय करा. खासकरून सोनोग्राफी हया दिवसात आनंद देणाऱ्या असतात.

हया टेस्ट आपल्या गर्भाच्या वाढीच्या दर्शक आहेत. त्यामुळे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे चांगलेच. ह्यांनी सगळं काही नीट चालु आहे ह्याचा दिलासाच मिळतो. वर नमूद केलेला आराखडा सर्व साधारण असून ह्यातील काही गोष्टी तुमच्या डॉक्टरनुसार बदलू शकतात. तरीदेखील साधारण माहिती मांडत आहे.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!