बाळाचे गॅस आणि घरगुती उपाय Simple Reliefs for baby Gases and colic

लहान बाळंमध्ये एक अगदी नवजात अर्भाकापासून थोडया मोठया मुलांपर्यंत एक समस्या असते ती म्हणजे बाळाचे गॅसेस. हो बऱ्याच अंशी बाळांना गॅसचा त्रास होतोच. आणि ते अगदी साहजिक देखील आहे.

लहान बाळांची पचन शक्ती ही पूर्णतः विकसित नसते. ती हळूहळू विकास पावते. त्यामुळे बाळांच्या पोटात गॅस तयार होतात. आणि बरेचदा ते बाहेर पडले नाहीत तर बाळाला infant colic म्हणून गॅस मुळे पोटात दुखण्याची शक्यता असते आणि त्याचा त्यांना त्रास होतों.त्यामुळे ती खुप वेळ रडू शकतात. दिवसातून बराच वेळ बाळ रडत असेल तर त्याला colic चा त्रास असू शकतो. तुमचं बाळदेखील असच गॅसमुळे रडतंय. तर काय उपाय कराल?

ह्यावर काय उपाय कराल??

  • ढेकर :अंगावर असणारी बाळे दूध तोंडात ओढतांना,हवादेखील तोंडात घेतात. त्या हवेमुळे गॅस होऊ शकतात. तेव्हा दूध पिऊन झाल्यावर बाळाला उभे घेऊन त्याची ढेकर काढत जा.त्यामुळे गॅस होणं कमी होईल.
  • मसाज :colic वर उपाय म्हणजे बाळाला रोज संध्याकाळी तेलाने चोळताना बेंबी भोवती बोटाने गोल गोल फिरवत मसाज करा.ह्यामुळे गॅस सुटतील.
  • व्यायामcycle :बाळाला आडवे दुपट्यावर ठेवून त्याच्या पायाचा सायकल सारखा व्यायाम करा ज्याने गॅस पटपट सुटतात. आणि बाळाला बरं वाटतं.
  • बाळाला पोटावर थोडावेळ ठेवून पाहा. त्याने देखील गॅस सुटतील.
  • हिंग :थोडेसे हिंग पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट बाळांच्या बेंबी भोवती लावा. व ती सुकू द्या. हा एक प्रभावी उपाय आहे ज्याने गॅस पटपट सुटतील आणि बाळाला बरं वाटेल.
  • ओवा :ओवा वरवंट्यावर वाटून किंवा खलबत्त्यात कुटून किंवा आईने तोंडात थोडा चावून बाळांच्या बेंबी भोवती लावा. ज्याने गॅसेस पटकन सुटतील.
  • ओवा पाण्यात उकळून त्याचे पाणी देखील पाजू शकता ज्याने पोट दुखणे थांबेल.
  • Colicaid /gripe water :डॉक्टर च्या सल्ल्याने तुम्ही colicaid हे औषध किंवा बाजारात मिळणारे gripe water देऊ शकता. ज्याने गॅसेस पासून बाळाला आराम मिळेल.

अशाच टिप्स साठी वाचत राहा आईपण!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!