बाळंतपणातील विश्रांती: नवमातेसाठी संपूर्ण मार्गदर्शक | Quick recovery through Postpartum

बाळंतपण म्हणजे postpartum हे डिलिव्हरी नंतर येणारं अगदी महत्वाचे सत्र आहे .आपल्या स्त्री म्हणून झालेल्या आणि आई म्हणून घातलेल्या जन्माचा खरा कस अगदी निघतो तो म्हणजे ह्या दिवसात .आपल्याला आलेला थकवा ,अशक्तपणा ,टाके ,जागरणं,अवघड जागेवरची दुखणं आणि नव्याने होऊ घातलेलं स्तनपान …बापरे सांगू तितकं कमी आहे.ह्या सगळ्याला सामोरे जाताना आपल्याला असं वाटतं कि जमणारे ना आपल्याला हे सगळं ????ह्याचा अनुभव नवा आणि पहिला वाहिला असेल तर मग असे प्रश्न अगदी पडू लागतातच .साहजिक आहे .पण घाबरून जाऊ नका .इथे मी कोणतं cheesy उत्तर देत नाहीये पण हकीकत सांगत्ये .त्या सगळ्यातून पार पाडण्याचं बळ पण येतं आपोआप .शेवटी हा निसर्ग आहे ना ,त्याने सारी तरतूद केलेली आहेच .थोडी परीक्षा पाहतो पण तरूनही नेतो तो आपोआप !!!!! आणि आपली काही पारंपरिक वळणंदेखील आपल्या सोयीची असतात .ती देखील आपल्याला भरपूर आराम मिळावा म्हणजे आपली झीज पटकन भरून निघेल अशीच असतात .त्यामुळे तरून जाणार आहात!!!!!!कारण माझा अनुभव सांगणारा ब्लॉग आहे ना तुमच्या मदतीला !!!!!!!! वाचा बाळंतपणात घ्यावयाची काळजी कशी घ्याल ????

This post talks about the postaprtum period rest and how much important role it played during these days. It also tells some useful tips to pamper yourself and it answers the questions about the “balantpanat aram kasa karava?”,” balantpanatil vishranti kashi asavi?”

Table of content

बाळंतपणातील माझा अनुभव | My Experience through Postpartum

आता तुम्ही आई होऊन काही दिवस झाले असतील. शेक शेगडी, breastfeeding चा पहिला अनुभव घेत असाल तुम्ही आणि तुमचे बाळदेखील. टाके अजून दुखतच असतील. अंग अजून दुखत असेलच. अशक्तपणा जाणवत असेलच. काळजी करु नका. हे सगळं अगदी नॉर्मल आहे.

तुमच्या थकलेल्या शरीराला विश्रामाची गरज आहे. एका जीवातून दुसरा जीव निर्माण होणं सोपं नाही. शारीरिक झिज होते. अंगातील शक्ती कमी होते आणि शारीरिक थकवा जाणवतो. त्यातून स्तनपानाने देखील थोडंसं गळायला होतं.त्याबरॊबरीने टाके देखील तितकाच त्रास देतात.

मला तर पहिले काही दिवस नीट बसताच येत नव्हते. मी उभ राहूनच जेवायचे. बाळाला अंगावर घेताना बसायला लागायचं तेव्हा आणखी त्रास जाणवायचा.बाळ झाल्यापासून रात्रीची झोप नीट होत नव्हतीच. जरा सकाळी झोप लागायची तर अंघोळ घालणाऱ्या बाई यायच्या. उन्हाळा असल्याने त्या लवकर यायच्या म्हणजे गारव्याची धुरी बाळाला देता येईल. माझी जरा चिडचिड होयची. पण त्यांनी अंग मळायला घेतलं कि खूप बरं वाटायचं. पथ्य देखील बरीच असायची. सगळे म्हणायचे बाळ झोपल्यावर झोपून घे पण मला काही झोप यायची नाही लगेच. आणि जरा लागायला लागली कि बाळ उठून बसायचं. त्यामुळे झोप जायची. तेव्हा नाही म्हटलं तरी माझी थोडी चिडचिडच व्हायची. शेवटी एक दिवस माझी बहीण मला म्हणाली कि नुकत्याच डिलीव्हरी झालेल्या मुली कशा तुपात आपलं बाळंतपण एन्जॉय करतात? मस्त तूप लावलेलं चांगल चुंगलं खातात आणि छान मालिश शेक घेऊन झोपा काढतात.. तु तसं का नाही करत? Rather ही तुला हक्काची सुट्टी आहे. तेव्हा मला जरा प्रकाश पडला. आणि मी पण ह्या नवीन routine ला used to झाले.

काळजी करु नका, हळूहळू हा त्रास कमी होईल. तुम्हाला तुमच्या ह्या नवीनच routine ला adjust होयला वेळ जाईल पण तुम्ही used to व्हाल. पहिले काही दिवस माझे देखील त्रासाचे किंवा चिडचिड करत गेले.हे अगदी नॉर्मल आहे. केवळ तुमचा focus सध्या बाळंतपण enjoy करण्यावर ठेवा.

तर हे बाळंतपण कसं enjoy कराल? | Enjoy your postpartum

  • झोप :रात्रीची झोप तुम्हाला नीट फारशी नाही मिळणार कारण बाळ दुधू प्यायला उठेल. आणि तुम्हाला feeding द्यावं लागेल. पण दिवसा बाळ झोपलं कि छान झोप काढत जा. ऊबदार कपडे, अंगावर शेकाचा वास आणि मऊ ब्लॅंकेट.. बास !!छान झोप येईलच. जेवढी झोप चांगली मिळेल तेवढे ताकद भरायला मदत होईल.
  • दिवसातून एकदा चक्कर : जरी व्यायाम तात्पुरता outofscope असला तरी घरातल्या घरात पाय मोकळे करणं काही चूक नाही. संध्याकाळच्या वेळात किंवा दुपारी जरा गाणी ऐकत थोडया फेऱ्या मारायला काही हरकत नाही.तूम्हालाच फ्रेश वाटेल. टाके देखील थोडे मोकळे होतील. अवघडणार नाहीत.
  • Hot tub :टाके khup दुखत असल्यास एका मोठया tub मध्ये गरम पाण्यात थोडंसं डेटॉल घालून त्यात बसा म्हणजे टाक्यांना आराम मिळेल. किंवा शेकाच्या वेळी छान शेकवून घ्या. अंघोळ करताना गरम पाणी घ्या. आराम मिळेल. आणि हो फक्त साबणाने टाके स्वच्छ धुवा. वॉशरूम वरून आल्यावर देखील तिथली जागा स्वच्छ ठेवा. Infection नको.

तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊन देखील तुम्हाला टाके पडले असतील तर अशा टाक्यांची काय काळजी घ्याल ??त्यांना आराम कसा मिळेल ??ह्या साथीचे एक quick इंस्टाग्राम गाईड पहा त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे पटकन मिळतील .तुम्हाला हे नक्कीच useful ठरेल .

बाळंतपण आणि आचरण :विश्राम how to take Rest post delivery???

आणखी काही ज्या मला important वाटल्या अशा गोष्टी. ज्या मी माझ्या अनुभवातून शिकले त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ,ज्या मला इतर बायकांनी त्यांच्या अनुभवातून सांगितल्या आणि ज्याचा मला फायदा झाला अशा काही.तुम्ही देखील तुमचा comfort झोन बघून त्यातील गोष्टी नक्कीच इम्पलिमेन्ट करू शकता त्याचा नक्कीच तुम्हाला देखील फायदा झालेला दिसेल .

बाळंतिण म्हणून बाळंतपणात घ्यावयाची काळजी | Few important tips for postpartum recovery

  • वात अंगात जाऊ नये म्हणून कानाला scarf बांधत जा. पंख्याचा किंवा ac चा सरळ वारा अंगावर घेऊ नका. स्वेटर वापरा.
  • पायात sleepers with socks किंवा नंतर नुसत्या sleepers वापरा. Atleast फरशीचा गारवा लागणार नाही याची काळजी.
  • सर्दी होऊ नये यासाठी काळजी घ्या. कारण आईला झाली तर लगेच बाळाला होऊ शकते
  • पोटपट्टा बांधा म्हणजे कंबरेलापण आधार राहील. आणि बरं वाटेल.
  • बाळाला प्यायला घेताना तक्क्याला टेकून बसा म्हणजे पाठ कंबर दुखणार नाही. तुम्हाला पाठीत वाकायला लागू नये म्हणून breastfeeding pillow किंवा एकावर एक दोन उशा व त्यावर बाळ असं घेऊन बसत जा म्हणजे तुम्हालादेखील comfortable वाटेल.
  • अंघोळीला कडकडीत पाणी अंगावर घ्या म्हणजे बरं वाटेल. थकवा कमी होईल. झिज भरून निघेल.
  • Breastfeeding च्या वेळेस तहान लागू शकते तेव्हा पाणी जवळ घेऊन बसा.

Read More : बाळंतपणातील मानसिक स्वास्थ्य कसं जपाल ??

बाळंतपणात घ्यावयाची काळजी हि अतिशय महत्वाची आहे .जेवढे हे दिवस तुम्ही स्वतःला जपाल तेवढं तुमचं पुढील आयुष्य तुम्हाला सोपं जाईल .काही गोष्टी ह्या कथित वाटत असतील तरी गरजेच्या असतात किंवा प्रसूती आणि त्यानंतर येणारं बाळंतपण ह्या अशा गोष्टी आहेत कि ज्याने तुम्ही बऱ्याच बायकांशी relate करू शकता कारण हा सगळ्या बायकांचा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो .ही तुमची हक्काची सुट्टी आहे. छान आराम करा. जेवढा आराम कराल तेवढी झिज पटकन भरून निघेल तेवढं तुम्हाला बाळाबरोबर पण एन्जॉय करता येईल.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच काही नवीन गोष्टी, अनुभव आणि टिप्स तुमच्याकरता… वाचत राहा आईपण.

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

🛋️📚 बाळंतपणात विश्रांतीसाठी उपयुक्त उत्पादने (Essentials for New Moms)

1. 📖 मातृत्वावर आधारित मार्गदर्शक पुस्तके

बाळंतपणानंतर शारीरिक व मानसिक समज वाढवण्यासाठी उपयोगी. स्तनपान, आहार, विश्रांती व पालकत्व यावर आधारित विश्वसनीय पुस्तके वाचा.


2. 🛏️ ब्रेस्टफीडिंग पिलो (Breastfeeding Pillow)

स्तनपान करताना योग्य पोस्चर राखण्यासाठी मदत करणारा आरामदायक पिलो. मातेच्या मान, पाठ व खांद्यांना आधार देतो.


3. 🎀 बेली बँड / पोस्टपार्टम बेल्ट (Belly Band)

डिलिव्हरीनंतर पोट घटवण्यासाठी आणि शरीराला आधार देणारा सपोर्ट बेल्ट. पाठीचा ताण कमी करण्यासाठी उपयुक्त.


4. 🪑 रिक्लायनिंग चेअर (Reclining Chair)

बाळंतपणातील थकवा घालवण्यासाठी आरामदायक reclining चेअर खूप उपयुक्त ठरते. स्तनपान, झोप किंवा फक्त रिलॅक्ससाठी आदर्श.

🛒 आरामदायक reclining चेअरचे पर्याय पाहा → [Link]


टीप:

ही उत्पादने नवमातेला अधिक विश्रांतीपूर्ण आणि आरामदायक बाळंतपण अनुभवायला मदत करतात. खरेदी करताना गुणवत्ता, वापराच्या गरजा व शरीराच्या प्रकृतीनुसार निवड करावी.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बाळंतपणात विश्रांती का आवश्यक आहे?

उत्तर: बाळंतपणानंतर शरीरात मोठे बदल होतात – गर्भाशय आकुंचन पावतो, हॉर्मोनल बदल होतात, रक्तस्त्राव होतो. यामुळे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांतीची गरज असते, ज्यामुळे आई लवकर बरी होते.

बाळंतपणात किती काळ विश्रांती घ्यावी?

उत्तर: साधारणतः पहिल्या ४० दिवसांचा काळ (सूतिका काळ) विश्रांतीसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. परंतु, प्रत्येक आईची गरज वेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा.

3. डिलिव्हरीनंतर लगेच उठून चालणे सुरक्षित आहे का?

त्तर: सामान्य डिलिव्हरीनंतर थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर हळूहळू चालणे सुरक्षित मानले जाते. सिझेरियन झाल्यास डॉक्टरांनी सांगितलेली विश्रांतीची मुदत पाळावी.

पोस्टपार्टम विश्रांतीदरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

उत्तर:

अवास्तव घरकाम

वजन उचलणे

सतत स्क्रीनवर वेळ घालवणे

कमी झोप

गरजेपेक्षा जास्त पाहुणे समारंभ

बाळ आणि घर सांभाळत आई स्वतःसाठी विश्रांती कशी मिळवू शकते?

दिवसात बाळ झोपल्यावर आईनेही झोपावे

कुटुंबाची मदत घ्यावी

काही घरकाम outsource करावे

स्वतःसाठी वेळ राखावा

विश्रांतीदरम्यान कोणती उत्पादने उपयोगी पडतात?

ब्रेस्टफीडिंग पिलो

बेली बँड / पोस्टपार्टम बेल्ट

रिक्लायनिंग चेअर

आरोग्यवर्धक पुस्तके

हॉट वॉटर बॅग्स

रिलॅक्सिंग अरोमा ऑइल्स

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *