गर्भधारणेतील नववा महिना – माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी | 9th month pregnancy tips by mom

आता तुमचा नववा महिना आला आहे. म्हणजे तुम्ही बराच मोठा प्रवास पार पाडलेला आहे. तुम्ही प्रेग्नन्सीच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचला आहात. आता हत्ती गेलाय पण फक्त शेपूट बाकी आहे. पण हे शेपूट सर्वसाधारण नाही. ही तुमची थोडीफार कसोटी पाहणारी परीक्षा आहे. तरीदेखील घाबरू नका, ही निसर्गासाठी व डॉक्टरांसाठी अगदी routine process आहे. तेव्हा काळजी करण्यासारखं काहीच नाही. प्रसव वेदना म्हणजेच labor pain कठीण असलं तरीही नॉर्मल आहे व बाळाचा रडण्याचा पहिला आवाज ऐकला कि त्याचा विसर आपोआप पडतोच. व इतरांना सांगायला एक story राहते.

This post talks about pregnancy tips during 9th month. It also talks about what preparations to do?? what precautions to take? this post answers the questions like ” navvya mahinyat kay kalji ghyavi?”,”deliverychi tayari kashi karavi?”

Table of Content

पण ह्या परीक्षेसाठी म्हणजे डिलिव्हरीपूर्वी नवव्या महीन्यात काय काळजी घ्याल?

आधी काय काळजी घ्याल? ते पाहू

व्यायाम

आता ह्या शेवटच्या महिन्यात एक प्रकारचं अवघडलेपण जाणवू शकतं. पोट जड वाटू शकतं. हळू हळू दिवस जवळ येईल तेव्हा पोट आणखी खाली उतरल्यासारखं जाणवेल. पायावर थोडी सूजही असू शकेल. तरीदेखील बेडरेस्ट नसेल तर थोडंसं चलनवलन चालु ठेवा. Routine कामं थोडीफार करत राहा. संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा चालायला जायला हरकत नाही.वाकून करायची थोडीफार कामं प्रकृती ठीक असेल तर करायला हरकत नाही.फार दगदग नाही पण हळू हळू एक दोन चक्कर आसपास मारायला हरकत नाही. शरीर active ठेवणं हे आपलं उद्दिष्ट आहे पण अतिरेक टाळा. जर सल्ल्यानुसार योगासन करत असाल तर ती डॉक्टरांना विचारून चालु ठेवा. सध्या kegel exercise चा ट्रेंड आहे.ओळखीतील तज्ज्ञाकडून माहिती करुन घ्यायला हरकत नाही.

विश्राम :

ह्या दिवसात विश्रांती घेणं देखील गरजेचं आहे. रात्रीची व दुपारची झोप गरजेची आहे.पोट मोठं झाल्याकारणाने झोपावयास थोडं त्रासाचं वाटेल. तेव्हा डाव्या कुशीवर वळून दोन पायांमध्ये मऊ उशी घेऊन झोपणं चांगलं त्यामुळे थोडा comfort मिळून झोपणं सोपं जाईल. Delivery दरम्यान शरीर एक प्रकारच्या तणावातून जातं. त्यानंतर जन्माला आलेलं बाळ देखील आईची खूप जागरण करतं. त्यामुळे आता आराम करुन घ्या. डिलिव्हरी नंतर रेग्युलर झोपेस तुम्हाला काही महीने मुकावं लागणार आहे.

आहार :

जशी डिलीव्हरी जवळ येईल तसं जडान्न टाळा खासकरून रात्रीचं. पचनास सुलभ व कमी जळजळीत जेवण घ्या. एखादी आवडीची गोष्ट असेल तर सुरुवातीच्या दिवसात खावंसं वाटत असेल तर प्लॅन करुन तुमच्या spouse बरोबर म्हणजे नवऱ्याबरोबर एखादा दिवस एन्जॉय करा. अर्थात काही अपाय होणार नाही ह्याची काळजी घेऊन. कारण बाळ झाल्यानंतर खूप दिवस तुम्हाला पथ्य पाळावी लागतील. शेवट शेवट पोट साफ राहील अशा गोष्टीं आहारात ठेवा. लक्षात ठेवा डिलिव्हरीच्या दिवशी एनिमा देऊन आईचं आधी पोट साफ केलं जातं. तेव्हा ह्या गोष्टींची काळजी घ्या. पण पोट उपाशी ठेवू नका. तुमच्या भुकेनुसार पोटभर जेवा. कदाचित शेवटच्या महिन्यात भूक थोडी वाढू शकते. ह्या दिवसात बरेचदा वॉशरूमला जावे लागू शकते जे कि नॉर्मल आहे म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण कमी करू नका. प्रेग्नन्सी सहज पार पाडण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे.

मानसिक स्वास्थ :

ह्या दिवसात मन शांत व पॉझिटीव्ह ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा मेडिटेशन किंवा नामस्मरण जे आवडेल ते तुम्ही फॉलो करु शकता. तुमच्या spouse सोबत quality time spend करा. स्वतःजी काळजी घेत व प्रवास टाळत simple dates प्लॅन करा. घरी एखादा छान मूवी एन्जॉय करा. किंवा एकत्र आवडीचं (अपाय न होणारं )डिनर एन्जॉय करा कारण बाळ झाल्यानंतर काही दिवस तुमचा ह्या सगळ्यावरील फोकस शिफ्ट होणार आहे.

ह्या व्यतिरिक्त आणखी महत्वाची गोष्टी

ह्या व्यतिरिक्त आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे होणाऱ्या आईने ह्या शेवटच्या महिन्यात अंघोळीच्या वेळेस रोज निप्पल्स हळू हळू अलगद ओढणे गरजेचे आहे की जेणेकरून बाळ झाल्यानंतर तुमचे निप्पल्स बाळाला दूध ओढण्यासाठी आपोआप पुढे आलेली असतील व बाळाला दूध पिणे सोपे जाईल.

लक्षात ठेवा ह्या दिवसात बाळाच्या हालचाली वर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बाळाची हालचाल न जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

आणखी एक गोष्ट म्हणजे पोटावरची त्वचा ताणली गेल्याने खाज जाणवू शकते त्यावर आपलं नेहमीचं खोबरेल तेल हलक्या हाताने लावायला हरकत नाही.पाठीचे स्नायू मोकेळे करण्यासाठी अधून मधून हलका मसाज बसून करून घेण्यास हरकत नाही. त्यांनी आराम वाटेल.

ह्या दिवसात करायची आणखी एक गोष्ट म्हणजे maternity photoshoot. सध्या ह्याचा फार ट्रेंड आहे. एक आठवण म्हणून करण्यास काहीच हरकत नाही.ह्यासाठी तुमच्या आवडीचं क्लोथिंग निवडून, त्यावर टीआरा सारखी aceesories वापरून गार्डन्स सारख्या लोकेशनवर तुम्ही couple फोटोशूट करू शकता. ह्याचा देखील आनंद घ्या.

ही झाली काळजी. आणखी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तेव्हा डिलिव्हरी व होणाऱ्या बाळासाठी शेवटच्या महिन्यात तयारी काय कराल हे पुढच्या पोस्ट मध्ये पाहू.

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

🌸 गर्भधारणेदरम्यान वापरता येणाऱ्या उपयुक्त वस्तूंसाठी खास शिफारसी -Pregnancy Essentials

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

DOLTAS कॉटन 3-इन-1 पोस्टपार्टम बेली बँड

DOLTAS चा हा 3-इन-1 पोस्टपार्टम बेली बँड नवमातांसाठी खास तयार करण्यात आला आहे. नैसर्गिक कॉटनपासून बनलेला असल्यामुळे त्वचेसाठी सुरक्षित असून, तो सौम्य आणि सॉफ्ट टच देतो. प्रसवानंतर उद्भवणाऱ्या कंबरदुखी, पोटाच्या शिथिलपणामुळे होणारा त्रास आणि शरीराला आधार देण्यासाठी हा बँड अतिशय उपयुक्त ठरतो. त्याच्या 3-इन-1 डिझाइनमुळे पोट, कंबर आणि पाठीला एकत्रित आधार मिळतो आणि शरीर मूळ आकारात परत येण्यास मदत होते. रोजच्या वापरासाठी योग्य, हलकासा आणि शरीराला चांगला फिट बसणारा हा बँड नवमातांसाठी एक विश्वासार्ह साथीदार आहे.

💡 सूचना / शिफारस:

9th Month Pregnancy – Frequently Asked Questions (FAQ)

1. What precautions should I take in the 9th month of pregnancy?

उत्तर: या महिन्यात पुरेशी विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या, जास्त पाणी प्या आणि तणाव टाळा. जड कामं टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला नियमित घ्या.

2. Is walking safe in the 9th month?

उत्तर: होय, थोडंसं चालणं फायदेशीर ठरू शकतं – मात्र थकवा वाटल्यास लगेच थांबा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुरू करा.

3. What kind of diet is best during this month?

उत्तर: पोषक, हलका आणि पचनास सोपा आहार घ्या. फळं, भाज्या, दूध, डाळी आणि कोरडे फळ खा. मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा.

4. How do I know labor is starting?

उत्तर: वारंवार पाठीमध्ये दुखणे, खालच्या पोटात ताण जाणवणे, पाण्याची पिशवी फुटणे, आणि नियमित गर्भाशय आकुंचन ही प्रसवाची लक्षणं आहेत.

5. I can't sleep well – what should I do?

उत्तर: डाव्या कुशीवर झोपा, गादी किंवा उश्या योग्य प्रकारे लावा, झोपण्याआधी हलकी ध्यानधारणा करा. झोप अजूनही लागत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6. What is the difference between normal and C-section delivery?

उत्तर: नॉर्मल डिलिवरी ही नैसर्गिक पद्धतीने होते, तर सिझेरियन ही शस्त्रक्रियेद्वारे. आई व बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर योग्य पर्याय ठरवतात.

7. Can I travel during the 9th month?

उत्तर: शक्यतो प्रवास टाळावा. अत्यावश्यक असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निघा, आणि प्रवासाच्या काळात विश्रांतीची पूर्ण व्यवस्था ठेवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *