प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण : Know about Hindu traditions like chor oti in Pregnancy

What u Find in this Post??

This article helps u to understand religious and traditional practices performed during pregnancy in Maharashtrian families like chor choli function or chor oti bharan. You will get to know Chor oti kadhi bhartat?? chor oti kashi bharaychi??chor oti tradition is important part of pregnancy. It also focus on precautions during eclipse for pregnant ladies and dohale jevan vidhi in marathi. You will get ideas for dohaljevan in marathi.

आपल्याकडे सगळ्याच गोष्टींना अनुसरून त्यानुसार वळण पडावं ह्यादृष्टीने एक संस्कृती पूर्वापार बनलेली आहे.

ह्यातील काही गोष्टी काळानुसार वेगळ्या असतील तरीही काही गोष्टींना थोडेफार शास्त्रीय संदर्भ आहेत. तशाच काही गोष्टी आपल्या प्रेग्नन्सीशी देखील निगडित आहेत. अर्थातच त्यातील कोणत्या गोष्टी पाळवायच्या व कोणत्या नाही हे संपूर्णतः तुमच्या आस्थेवर अवलंबून आहे. आणि ह्यातील काही गोष्टी तुमच्या घरातील कुळाचारानुसार थोड्याफार बदलू शकतात तरीदेखील त्यातील काही संदर्भ द्यावेसे वाटतात.

aaipan.com: Know about Hindu traditions during pregnancy

आपल्याकडे ओटी भरणं (chor oti ) हा लग्न झालेल्या स्त्रियांसाठी अतिशय मोठा प्रघात असतो. बहुतांश विवाहित स्त्रियां लग्न झालं की देवींची ओटी भरणं किंवा सवाष्णीस वाण देणं ह्या गोष्टी करतात.

तरीदेखील आपल्याकडे दिवस गेले की गर्भवतीने ओटी भरू नये अशी पद्धत आहे. साधारण तुझी ओटी भरलेली आहे त्यामुळे तु कुणाची ओटी भरु नकोस असं तुमच्या घरातील स्त्रिया तुम्हास सांगतील. ह्यामागे गर्भवतीने पहिल्या काही महिन्यात खाली वाकू नये ह्यासाठी घातलेलं वळण असावं असं मला वाटतं कारण ओटी भरताना वाकून ओटी भरणं हा प्रघात असतो.

तसंच गर्भवतीची ओटी कधी भरावी?

तिसऱ्या महिन्यातील चोर ओटी :गर्भवतीस दिवस गेले की, साधारणतः तिसऱ्या महिन्यात तिच्या आईने चोर ओटी (chor oti ) भरण्याची पद्धत आहे. हा मान गर्भवतीच्या आईचा असतो.

सातव्या महिन्यातील डोहाळजेवण :सातवा महिन्यात गर्भवतीचे डोहाळजेवण असते. काही ठिकाणी ह्याचा उल्लेख ओटीभरण असा देखील होतो. ह्यात साधारण पाच सवाष्णींनी ( ज्यात तुमची सासु, आई ह्यांचा समावेश असतो )पाच फळांनी गर्भवतीची ओटी भरतात. साधारण गर्भवतीने हिरवी साडी नेसणं, फुलांचे किंवा आजकाल मिळणारे artificial दागिने घालणं, फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसणं अशा काही पद्धती आहेत. त्याचं बरोबर बर्फी का पेढा ओळखणं, डोहाळजेवणाची गाणी गाणं असा बायकांचा मनोरंजनपर कार्यक्रम असतो. माझं डोहाळजेवण गाणी ह्या विषयावरील पोस्ट वाचा .Top 10 famous डोहाळजेवण गाणी – आईपण (aaipan.com)

ग्रहणासंबंधित आचरण :

तुमच्या प्रेग्नन्सी दरम्यान ग्रहण असल्यासदेखील ठराविक पथ्य पाळणे लागू शकते. अर्थातच हा भाग तुमच्या श्रद्धेचा किंवा आस्थेचा असून खरंच योग्य की अयोग्य हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. एक माहिती म्हणून हा संदर्भ देण्यात आलाय.

Read More : बाळंतपण आणि धार्मिक आचरण

साधारण तुमच्या प्रेग्नन्सी दरम्यान ग्रहण येऊ शकते. आणि त्याचे पाळावयाचे नियम ते कुठे दिसणार आहे वैगरेनुसार ठरतात. तेव्हा तुमच्या घरातील वार्षिक पंचांगात बघून तुम्ही ठरवू शकता किंवा तुमच्या गुरुजींचे मार्गदर्शन घेऊ शकता.

तसेच ठराविक महिना लागला कि गर्भवतीच्या धार्मिक आचरणाचेदेखील नियम आहेत. जसं की गर्भवतीने ठराविक प्रकारच्या समारंभात भाग घेऊ नये जसं कि श्राद्ध वैगरे इत्यादी. त्याची माहितीदेखील तुम्ही पंचांग बघून घेऊ शकता किंवा प्रत्यक्षात तुमच्या गुरुजींचा सल्ला घेऊ शकता.

ह्या व्यतिरिक्त काही घरात प्रसूतीवेदना चालु झाल्यानंतरदेखील देवासमोर दिवा लावणं, गर्भवतीची ओटी भरून हॉस्पिटलमध्ये जाणं, देवास नमस्कार करुन निघणं ह्यानुसार तुमच्या घरातील कुळाचारांनुसार पद्धती आहेत. ज्याची माहिती तुम्ही घरातील प्रौढ स्त्रियांकडून घेऊ शकता.

लक्षात ठेवा देवावरील शुद्ध भाव आणि तुमची श्रद्धा ही सर्वात महत्वाची. बाकी गोष्टी तुम्हाला जशा पटतील, जमतील त्यानुसार तुम्ही पार पाडाल. तरीदेखील थोडीफार माहिती देणं गरजेचं वाटलं म्हणून संदर्भ देत आहे.

तुम्हाला माझा blog जर आवडला असेल तर follow करायला विसरु नका. Notifications साठी खालील follow बटण वर click करा आणि तुमचा फक्त email id द्या. किंवा तुम्ही मला ट्विटर वर देखील follow करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या माहितीसाठी आणि माझे अनुभव आपण disscuss करणार आहोत.

Reference : https://www.datepanchang.com/

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!