बाळंतपणात काय खावे?? संपूर्ण बाळंतिणीचा आहार |Simple Maharashtrian Post Delivery Diet

ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बाळंतपणात काय खावे ??ह्या प्रश्नाचे अनुभवी उत्तर म्हणजे बाळंतिणीचा आहार कसा असावा ???ते बघणार आहोत . ‘balantpanatil aahar ‘ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे .बाळंतिणीची झीज भरून काढण्यासाठी आणि तिच्या अंगावर चांगल्यापैकी दूध येण्यासाठी बाळंतिणीस गरजेची गोष्ट म्हणजे बाळंतपणातील आहार .माझं बाळंतपण आणि त्यात मला आलेले अनुभव आणि बाळंतिणीचा आहार तक्ता ह्याचा समावेश मी खालच्या ब्लॉग मध्ये करत आहे जेणेकरून सर्व मातांना त्याचा फायदा व्हावा .तर नक्कीच वाचा खालील पोस्ट !

Congrats !!!तुम्ही आई झालात आणि तुमची डिलीव्हरी सुखरूप पार पडली. मनातून खूप बरं वाटत असेल पण थकवा जाणवत असेल. टाके दुखत असतील जरा अंग आमल्यासारखा वाटत असेल. बाळाला घ्यावसं वाटत असेल पण दमला देखील असाल. Its okay..हे सगळं नॉर्मलच आहे.

डिलीव्हरीमध्ये शरीर अनन्यसाधारण तणावाखालून जातं. त्यामुळे असं दमल्यासारखं अंग वाटणं अगदी साहजिक आहे. पण ही झिज भरून काढण्यासाठी त्यानुसार आहार घेणं अतिशय गरजेचे आहे आणि त्यासाठी कस जेवाणखाणं ठेवाल? काय पथ्य पाळाल?

लक्षात घ्या ही पथ्य जरा त्रासदायक वाटतील किंवा नकोशी वाटतील पण लॉन्ग टर्म मध्ये ती आपल्या शरीरासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहेत .त्या आपल्या शरीराची संपूर्ण झीज भरून तर निघेलच पण त्याबरोबर बाळाला पौष्टिक दूध अंगावर येईल आणि अंगातील वात निघून जाण्यास मदत होईल !! तुम्हाला सुरुवातीला जरा त्रास होईल ,अर्थात आपल्याला पाव भाजी ,पिझ्झा खूप आठवेल .पण थोडा त्रास अंगावर सहन करा .एकदा सवय लागली कि काही वाटणार नाही आणि अर्थात थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे .तर पाहुयात पथ्य नक्की कोणती आणि कशी आहेत ती!!

Table of content

Read More : अळिवाची खीर कशी कराल ??

पाहिले काही दिवस काय टाळाल? बाळंतपणात काय खाऊ नये ?? | What to avoid eating during Indian postpartum diet?

  • भाज्या :सिमला मिरची, गवार, कांद्याची पात, कोबी, फ्लॉवर,वांगी, बटाटा ह्या वातूळ भाज्या.
  • कडधान्ये :चवळी, पावटा, वाल, छोले, हरभरा इत्यादी.साधारण पचनास जड असल्याने टाळावीत.
  • फळे :कोणतीही आंबट फळे, फणस, सीताफळ इत्यादी

उकळलेलं पाणी :

10 ते 15 मिनिटे उकळलेले पाणी पिणे गरजेचे आहे. त्यांनी शरिरास फायदा होतो. कोणतेही infection होत नाही आणि वात कमी होण्यास मदत होते. पहिले सव्वा महिना शक्यतो गरम पाणी प्यावं. उन्हाळा असेल तर गरम पाणी नॉर्मलला आल्यावर प्यायलं तर चालेल. इतर पुढील महीने रोज सकाळी उकळून ठेवलेलं पाणी प्यावं.

इतर नियम :

  • शिळे अन्न खाणे पूर्ण टाळा. ह्याचा तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • पाणीपुरी, पावभाजी, पिझ्झा तत्सम फास्टफूड पहिले तीन महीने पूर्ण बंद करा. आता शारीरिक झीज आणि पौष्टिक स्तनपान ह्या मुख्य गरजा आहेत. त्या कोणत्याही प्रकारच्या फास्टफूड मधून पूर्ण होत नाहीत.
  • कांदा,अंडी आणि मांसाहार टाळा. शक्यतो आहार पहिले काही दिवस सात्विक असु दे.
  • स्वयंपाकात मिरचीचा वापर पहिले काही दिवस टाळा. टाक्यांना मिरचीमुळे त्रास होऊ शकतो.
  • पहिले चार दिवस पोट साफ होणारं नाही किंवा अजिबातच टॉयलेटला होणारं नाही असं होऊ शकतं. नॉर्मल आहे. तेव्हा आहार fiber rich असू दे. जेणेकरून पोट लवकर साफ होइल.

बाळंतपणात काय खावे?? | What to eat during Indian postpartum diet?

  • भाज्या :दुधीभोपळा, भेंडी, पडवळ इत्यादी फळभाज्या चांगल्या.भेंडी ही कंबरेला उत्तम. पालक, माठ, मेथी ह्या पालेभाज्या पचनास चांगल्या. झिज भरून काढण्यास उत्तम.
  • डाळी :मुगाची डाळ उत्तम,पहिले काही दिवस मुगाच्या डाळीची आमटी चांगली.
  • पीठ :बाजरीचे पीठ उत्तम.थंडीचे दिवस असतील किंवा उन्हाळा नसेल तर आहारात बाजरीची भाकरी चांगली. पोटभर होते आणि अंगावर दूध येण्यास चांगली. कुळीथाचे पीठ चांगले. त्याच्या पिठल्याचा आहारात समावेश असेल तर विटाळ साफ होतो.
  • फळे :साधारण डाळिंब, पपई, गोड द्राक्षे ही फळे चालतात.
  • तूप :पोळी, भाकरी, भात, शिरा जे खाल त्यावर भरपूर तूप घ्या. बाळंतिणीच्या आहारात तुपाचा समावेश असणे आमूलाग्र महत्वाचे आहे.
  • इतर :कणकेचा, रव्याचा गोड शिरा नाष्ट्यास चांगला. मुगाच्या डाळीची खिचडी चांगली. नुसतं आलं घालून मिरचीशिवाय केलेला सांजा चांगला. तूप लावून मेथीचे ठेपले चांगले.अधून मधून आंबोळ्या.

स्तनपानासाठी काय चांगले? अंगावर दूध येण्यासाठी बाळंतपणात काय खावे ??| Healthy Indian food for breastfeeding moms

खिरी :खसखशीची खीर, खारकेची खीर, बदामाची खीर, अळिवाची खीर

लाडू :डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू, मेथीचे लाडू

पाण्यात भिजवलेले बदाम

दूध :शतावरी कल्प घालून दिवसातून दोनदा तीनदा

बाळंतिणीचा आहार तक्ता | Simple and basic diet chart for Indian Postpartum( My personal favourites)

सकाळी तुपात भिजवलेला डिंक मग चहा आणि glucose बिस्कीट
थोड्यावेळाने खसखशीची खीर /बदामाची खीर किंवा शतावरी कल्प घालून दूध
न्याहारीगरम गरम बाजरीची भाकरी, त्यावर भरपूर तूप, मुगाच्या डाळीची आमटी, चवीला नुसत्या लसणाची कोरडी चटणी, अधून मधून कुळिथाचे पिठलं. (बाजरीची भाकरी गरम गरम खूप छान लागते )
जेवण भरपूर तूप घालून पोळ्या, पालेभाजी (मी जास्त खाल्ल्या )किंवा फळभाजी( दुधी भोपळा /भेंडी ), मुगाच्या डाळीची आमटी, थोडासा भात (काळी मिरी घालून )
चार वाजताचहा व बिस्कीट
मधल्या वेळात दूध (त्यात शतावरी कल्प, कधी कधी नाचणी सत्व ), भिजवलेले 10 ते 15 बदाम, डिंकाचा किंवा अळीवाचा लाडू, कधीकधी गोड शिरा
रात्रीचे जेवणमुगाच्या डाळीची खिचडी तूप घालून, लिंबाचे लोणचे/गरम गरम मेथीचे ठेपले /गरम गरम ambolya /मऊभात आणि मिरी घालून टोमॅटो सूप
मुखशुद्धीबाळंतशोपा
बाळंतिणीचा आहार तक्ता

वर सांगितलेला आहार हा माझ्या स्वतःच्या अनुभवातून मांडला आहे .glucose च्या biscuits नी टाके भरायला मदत होते .तुपामुळे पचन सुधारते आणि झीज भरून निघते.काळी मिरी घातल्यास काही बाधत नाही असं म्हणतात .कुळीथ सगळं विटाळ साफ करते .पालेभाज्या झीज भरून काढतात .डिंकामुळे कंबर भरून येते ,पुढील आयुष्यात त्रास होत नाही .लसूण वाट कमी करतो.खिरींमुळे दूध चांगले आणि पौष्टिक येण्यास मदत होते .

अशा प्रकारे आहार ठेवला. थोडी पथ्य पाळली की अंगाची झिज भरून निघेल. बाळाचं आरोग्य छान राहील. अंगावर दूध चांगलं आणि पौष्टिक येईल. काही दिवसांनी सैंधव घालून दुपारी थोडंसं ताक चालेल. बाहेरच्या गोष्टींची सवय करताना तीन महिने झाले कि हळू हळू करा. एकदम आहारात बदल करू नका. आणखी जाणून घ्यायचं असेल तर डॉ. बालाजी तांबे ह्यांचं ‘गर्भ संस्कार ‘रेफेर करु शकता.

ह्या व्यतिरिक्त बाळंतपणात आराम कसा कराल ??आरोग्य कसे जपाल ??बाळंतिणीची कशी काळजी घ्याल ??ह्याबाबद्दल वाचवायचे असल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्या postpartum म्हणजे बाळंतपणावर आधारित असणाऱ्या page वर मिळेल.ह्यात बाळंतिणीने आपले मानसिक आरोग्य कसे सुधारावे पासून ते स्तनपान कसे करावे ह्याबाबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या तळहातावर तुम्हाला वाचावयास मिळेल.ज्याचा नक्कीच बऱ्याच मुलींना व त्यांच्या आयांना फायदा होईल तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि तुमच्या शंका मला मेल करा .

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *