प्रेग्नन्सी हा तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींप्रमाणे एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे त्याच्याशी निगडित प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे.
बाळ म्हटलं की त्याबरोबर थोडाफार खर्चदेखील आलाच. अगदी प्रेग्नन्सीपासून डिलीव्हरी, त्यानंतरचे खर्च, पहिल्या वर्षांचा वाढदिवस, शालेय शिक्षण, कॉलेज , करिअर, higher education असे खर्च चालूच होतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलाला चांगल्या प्रकारचं आयुष्य द्यावं असं फार मनापासून वाटतं. आणि त्यात आर्थिक बाजू खूप मोठा रोल प्ले करत असते. आता काही गोष्टींमध्ये बाळाचे आजी आजोबा हातभार लावतीलच तरीदेखील आईवडील म्हणून तुम्ही तयारी ठेवणं गरजेचं आहेच. ती तुम्ही कशी कराल?
सर्वच गोष्टींची आपण आधीपासून मांडणी केली तर थोडं सोपचं जाईल नाही का?
- तर हे प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग कसं कराल? | How to financially plan pregnancy in india??
- आपल्याकडे साधारण child expenses खालीलप्रमाणे | Basic child expenses
- प्रेग्नन्सी खर्च :साधारण होण्याऱ्या खर्चाचा आढावा. | Basic Pregnancy expenses as follows:
- डिलिव्हरी खर्च :हा साधारण मॅटर्निटी हॉस्पिटल व डॉक्टर्स नुसार बदलू शकतो तरी साधारण अंदाज. | Common Delivery expenses as follows:
- प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग – प्रेग्नन्सीनंतर बाळंतपणाचा खर्च :आता हा खर्च आपण करु तेवढा वाढतच जातो. तरीदेखील एक basic idea मांडत आहे. | Post Delivery expenses as follows:
- बाळाच्या future साठीची long term investment :
तर हे प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग कसं कराल? | How to financially plan pregnancy in india??
Planning करताना आर्थिक तरतूद करण्यापूर्वी साधारण खर्च किती येईल? ह्याचा एक अंदाज घेऊ आणि त्याची तरतूद कशी होईल हे बघू.
आपल्याकडे साधारण child expenses खालीलप्रमाणे | Basic child expenses
- प्रेग्नेंसी खर्च :ह्यात डॉक्टर visits, औषधं, सोनोग्राफी, प्रेग्नन्सी इतर टेस्ट.
- डिलिव्हरी खर्च :नॉर्मल /सिझेरियन, हॉस्पिटल स्टे.
- प्रेग्नन्सी नंतर ( बाळंतपण खर्च ):बाळाच्या डॉक्टर visits, बाळाचे पहिल्या काही महिन्यांचं लसीकरण, औषधं, बाळाचे कपडे, खेळणी,diapers, अंगलावणारी बाई, पाळणा वैगरे साहित्य इत्यादी.
- बाळाच्या पुढील आयष्यासाठीची इन्व्हेस्टमेंट
प्रेग्नन्सी खर्च :साधारण होण्याऱ्या खर्चाचा आढावा. | Basic Pregnancy expenses as follows:
डॉक्टर visit टोटल चार्जेस :avg ₹500 ×avg 10 visits = ₹5000
Monthly औषधं :avg ₹1000 ×9 months =₹9000
टोटल सोनोग्राफी चार्जेस :avg 2000 ×avg 5visits =₹10000
आईचं प्रेग्नन्सी मधील लसीकरण :avg ₹1500 -₹2000
इतर टेस्ट खर्च :avg ₹3000( basic mention करत आहोत )
म्हणजे साधारण टोटल खर्च =₹29000
वर नमूद केलेला खर्च हा साधारण असून प्रत्येकाच्या नुसार थोडाफार बदलू शकतो. पण एक general idea आपण घेत आहोत.
आता ह्यासाठी तरतूद कशी कराल? | How to manage pregnancy expenses??
- प्रेग्नन्सीचा वरील खर्च तुमच्या पॉकेट मधूनच जाणार आहे. तो खर्च cover करण्यासाठी चान्स घेण्याअगोदर तुम्ही एखादी RD लावू शकता. पोस्टमधील RD ही जास्त कालावधीसाठीची असल्याने बँक हा पर्याय तुमच्यासाठी खुला आहेच.
- आता bank RD मधून तुम्हाला खूप interest मिळेल असं नाही. पण ठराविक रक्कम वेळेआधीच बाजूला पडल्याचा तुम्हाला फायदा होईल.
- तुमच्या चालू पगारावर ह्या खर्चाचा ताण येणार नाही. त्याची तरतूद ही आधीच करुन ठेवली असेल.
- व तितके पैसे लागले नाहीतर तुमचं additional savings च होतील.
- Minimum ₹3000 पासून सुरुवात करुन minimum वर्षभराचं tenure तुम्ही ठेवू शकता.
- साधारण चान्स घेण्याअगोदर वर्षभर किंवा लग्न झाल्यानंतर लगेच ह्या तरतुदीस तुम्ही सुरुवात करु शकता.
डिलिव्हरी खर्च :हा साधारण मॅटर्निटी हॉस्पिटल व डॉक्टर्स नुसार बदलू शकतो तरी साधारण अंदाज. | Common Delivery expenses as follows:
नॉर्मल डिलीव्हरी :₹25000 – ₹75,000
सिझेरियन डिलीव्हरी :₹40,000-₹2,00,000
ह्यातील डिलीव्हरी साठी येणारा खर्च हा साधारण एकरकमी व थोडा जास्त वाटू शकतो. हा कव्हर करण्यासाठी तुम्ही काय तरतूद करु शकता? | Simple efficient ways to cover delivery expenses as follows:
- हा खर्च कव्हर करण्यासाठी सर्वात बेस्ट ऑपशन म्हणजे employer group insurance. बऱ्याच कंपनीमध्ये तशी policy असते. व त्यातून तुमचा साधारण 50 ते 75 टक्के खर्च निघू शकतो.
- ज्यांना वरील ऑपशन उपलब्ध नाहीये त्यांसाठी इतर maternity insurance plan देखील उपलब्ध आहेत. साधारण लग्न झाल्यानंतरच तुम्ही as a couple म्हणून एखादा health insurance plan घेऊ शकता की जेणेकरून त्यात तुम्हाला maternity benefits and coverage मिळू शकेल. असा प्लॅन सिलेक्ट करताना त्याचं प्रीमियम, waiting period, newborn baby benefits ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.
- वरील पर्याय नसतील तर चान्स घेण्यापूर्वी एखादे जास्त रकमेचं recurring deposit लावणं गरजेचं आहे.
Read More : Maternity Insurance घेताना काय विचार कराल ??All about Maternity Insurance
प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग – प्रेग्नन्सीनंतर बाळंतपणाचा खर्च :आता हा खर्च आपण करु तेवढा वाढतच जातो. तरीदेखील एक basic idea मांडत आहे. | Post Delivery expenses as follows:
बाळाच्या डॉक्टर visits आणि पहिल्या तीन महिन्यातील लसीकरण : ₹4000 -₹6000
बाळाचे कपडे, diapers, wipes, खेळणी खर्च :
- कपडे :(नवीन घेणार असाल तर )total ₹2000-₹3000
- Diapers आणि wipes :महिन्याला avg ₹1200 ते ₹1500
- खेळणी व baby care :total ₹500-₹1000
- पाळणा, बाबागाडी, कपड्यांचा कपाट :₹2000 -₹3000
- अंगलावणी व अंघोळ घालणारी बाई :avg महिना ₹7500
आता पहिल्या तीन महिन्यांचा खर्च साधारण मांडत आहे. बाळ झाल्यावर बाळ आणि बाळंतिणीची काळजी ह्यावर पहिल्या तीन महिन्यात थोडा जास्त खर्च होऊ शकतो. किं बाळासाठी घ्यायच्या गोष्टी व इतर गोष्टीं .
ह्यावर होणाऱ्या खर्चाची तरतूद कशी कराल? | How to manage post delivery expenses ???
- आता हे खर्च निभावताना देखील तुमच्या मासिक उत्पन्नावर ताण येऊ शकतो. तेव्हा प्रेग्नन्सीनुसार ह्याची तरतूद तुम्ही आधीच करुन ठेवू शकता. ह्यासाठी एखादे recurring deposit काढून ती रक्कम आधीच वेगळी ठेवू शकता.
- तुम्हाला मिळणाऱ्या बोनस पगाराची रक्कम fixed deposit च्या स्वरूपात ह्या कामासाठी वेगळी ठेवू शकता.
- कुठून तुम्हास additional income आले ते देखील तुम्ही fixed deposit च्या स्वरूपात वेगळे ठेवू शकता.
लक्षात ठेवा वेळेआधीच तरतूद करुन ठेवणं हे फायद्याचं आहे. मग ती कशी करायची हा तुमचा निर्णय.
बाळाच्या future साठीची long term investment :
आतापर्यंतच्या खर्चाचे तेवढं प्लॅनिंग नसेल तरी ते निभावून जाईल. पण बाळाच्या future साठी लागणाऱ्या गोष्टींची investment करणं हे आईवडिलांच्यासाठी अतिशय गरजेचे आहे. त्याला चांगलं आयुष्य देण्यासाठी ह्याची खूप मदत होईल. मग ते तुम्ही कसे कराल?
- सर्वात गरजेचं म्हणजे बाळाचे life आरोग्याच्या दृष्टीने secure करण्यासाठी एक चांगला health insurance plan घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे employer group insurance असला तरी तुमचा separate health insurance plan असणंदेखील गरजेचं आहे. बाजारात अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या आई, वडिल आणि मुल ह्यांना एकत्रित स्वरूप असलेला हेअल्थ प्लॅन देतात. तेव्हा अशा प्लॅन्स चा अभ्यास करुन आपल्या कुटुंबाचं भवितव्य secure करा.
- ह्याव्यतिरिक्त investment करताना short term goals जसं की बाळाचा पहिला वाढदिवस, preschool, school donations ह्या गरजानुसार पोस्ट recurring deposits, bank recurring deposits, पोस्ट nsc ह्या मध्ये गरज लागेल तशी investments करु शकता.
- longterm goals जसं की कॉलेज, higher education ह्या साठी सुकन्या समृद्धी योजना, public provident fund, मार्केट systematic investment plans अशा ऑपशन्सचा विचार नक्कीच करु शकता.
- दरमहा एक ठराविक रक्कम ठरवून तीचे भाग करुन काही भाग short term investment ऑपशन्स मध्ये आणि काही long term investment ऑपशन्स मध्ये तुमच्या preference नुसार गुंतवू शकता.
लक्षात ठेवा तुम्ही आई होणार आहात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचादेखील विचार करणं तुम्हास गरजेचे आहे. आणि बाळाच्या बाबांप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करताना तुमचा देखील ह्यात active role असणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातून विचार कराल तेवढा तुम्हालादेखील फायदाच होईल.
तुम्हाला माझा blog जर आवडला असेल तर follow करायला विसरु नका. Notifications साठी खालील follow बटण वर click करा आणि तुमचा फक्त email id द्या. किंवा तुम्ही मला ट्विटर वर देखील follow करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या माहितीसाठी आणि माझे अनुभव आपण disscuss करणार आहोत.