गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून मूल होईल आनंदी व सदृढ!! | Indian Garbh Sanskar

ह्या पोस्ट मध्ये गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी ??गरोदरबाईने कसे जपावे ???गरोदरपणात आपलं मन कसं प्रसन्न ठेवावे जेणेकरून गर्भावर चांगले संस्कार होतील.आणि तुमचं आणि होणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम राहील .आपल्याकडे गर्भसंस्कार करण्याची पूर्वापार पद्धत आहे .आणि अगदी आपल्या आज्यांपासून ते बहिणीपर्यंत सगळे जण आपल्याला गर्भसंस्काराचे महत्व सांगतील .मी काय स्वतः अनुभवलं ते थोडक्यात तुमच्यासोबत मांडत आहे .

तुमच्या प्रेग्नंसीमध्ये जसं तुमचं शरीर महत्वाची भूमिका पार पाडत असतं तसं तुमचं मनदेखील महत्वाची भूमिका निभावत असतं.

निरोगी बाळाचा जन्म हा आधी आईच्या मनात होतो आणि मग गर्भात.तेव्हा तुम्हाला वाटतं त्यापेक्षा पण आपलं मन खूपच मोठी कामगिरी निभावत आहे .तुम्हाला असं वाटत असेल मग काय करावं??काही नाही फक्त तुमच्या मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवा .त्यासाठी काय करायचं ??ते अगदी साधं आणि सोपं आहे .तुम्ही नीट वाचा आणि करून बघा मग तुम्हालाही तुमच्यातील फरक जाणवेल .

गरोदरपणात मानसिक स्वास्थ्य का बिघडते ?? | Why does moods swings during pregnancy??

अशा काळात hormones मधील fluctuations मुळे तुमचे मूड्स सतत पालटू शकतात. पण ह्याकाळात तुमचं चित्त स्थिर आणि प्रसन्न ठेवणं हे देखील अतिशय गरजेचे आहे. कारण निरोगी आणि सुदृढ बाळाची सुरुवात ही शरीराआधी आईच्या मनात होत असते. स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स ह्या काळात अतिउच्च प्रमाणात कार्यरत असतात.एरवी सुद्धा मासिक पाळी येते तेव्हा आपल्याला त्यात मूडी होणं ,विनाकारण चिडचिड ह्या सगळ्या समस्या जाणवतातच.मग प्रेग्नन्ट होणं ह्यात तेर हार्मोन्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रोल असतो मग आपल्याला थोडा मानसिक बदल हा जाणवणारच .ह्यासाठी तुम्ही काय करू शकता?

गर्भवतीने  मनाची काळजी कशी घ्यावी

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी म्हणजेच गर्भसंस्कार कसे करावे ?? | How to perform Indian Garbhsanskar??

धार्मिक स्तोत्र | Reading a spiritual texts

आपल्या प्रौढांनी सांगितल्यानुसार गर्भसंस्कार हे आईच्या मनातूनपण होत असतात. त्यामुळं तुम्ही धार्मिक जरी नसाल तरी तुमच्या spiritualty वर थोडं फार काम करु शकता. तुमच्या मानसिक ऊर्जेसाठी तुमच्या आवडत्या देवाचं स्तोत्र देखील गुणकारी ठरु शकतं. एखादी पोथीदेखील अधूनमधून वाचू शकता. किंवा शुद्ध भावातून केलेलं देवाचं नामस्मरणसुद्धा पुरेसं आहे. तुमची कोणावर श्रद्धा आहे हे महत्वाचं नाही तर श्रद्धा आहे हे महत्वाचं. लक्षात ठेवा तुमचं positive belief खूप मोठी कामगिरी पार पाडत असतं.त्यातून तुमचं मन ताळ्यावर येण्यास मदत होते आणि मानसिक संतुलन राहण्यास फायदा होतो .माझ्या प्रेग्नन्सीदरम्यान मी रामरक्षा, व्यंकटेशस्तोत्र म्हणायचे.

नामस्मरण व मेडिटेशन | Simple meditation

तुम्ही जसं की, एखादी जपाची माळ ओढू शकता.ओंकाराचे सकाळी वदन करू शकता. सिम्पल फाईव्ह मिनिट मेडिटेशनदेखील फायद्याचं ठरु शकतं.

सध्याच्या युगात नामस्मरणात देव आहे हे लक्षात घ्या .अगदी आपल्याला सगळं काही नाही जमलं तरी दिवासातुंन पाच ते दहा मिनिटे आपण नक्कीच देऊ शकतो .मनासाठी मेडिटेशन म्हणजे ध्यान करणं ह्या सारखा दुसरा चांगल्या व्यायाम नाही .नुसतं श्वास घेताना आणि सोडताना मोजलं तरी आपल्याला खूप छान वाटतं मग ह्याचा आपल्या शरीरासाठी ,मनासाठी आणि बाळासाठी नक्कीच फायदा होईल .करून बघा .

चांगली पुस्तके वाचणे | Reading a good books

तुम्हाला पॉझिटीव्ह इन्स्पिरेशन देणारी पुस्तकंदेखील तुम्ही सहज वाचू शकता की जेणेकरून ती तुमचं मन सहज खिळवून ठेवू शकतील. चांगल्या व्यक्तींची चरित्र वाचू शकता .ऐतिहासिक चांगली पुस्तके ,महाभारत व रामायण ह्यावर आधारित छान पुस्तके किंवा सेल्फ हेल्प बुक्स देखील महत्वाची आहेत .त्यातून पण आपल्याला पॉसिटीव्हच वाटतं त्यामुळे तीही वाचायला हरकत नाही .ह्यासाठी मराठी वाचकांना रामायण, महाभारत, राजा शिवछत्रपती, छावा, मृत्युन्जय, राधेय असे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या चांगल्या व्यक्तीचं चरित्रदेखील वाचू शकता.

माझ्या आईने मला दिवस गेल्यावर छान पुस्तकं वाच की ज्याचे गर्भावर चांगले संस्कार होतील असं सांगितलं होतं. त्यामुळे ह्याकाळात मी युगंधर हे शिवाजी सावंत ह्यांचे पुस्तक वाचले होते. त्याबरोबर गोंदवलेकर महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ह्यांचीदेखील चरित्र माझ्या वाचनात आली.

Read More : गरोदरपणात कोणती पुस्तके वाचाल ??

चांगल्या गोष्टी पाहणं | Watching good shows on TV

ह्याव्यतिरिक्त youtube वर देखील बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. जसं की ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे , पॉझिटीव्ह स्पीचेस, चारुदत्त आफळे ह्यासारख्या कीर्तनकारांची कीर्तने,महाभारतातील व्यक्तीरेखांवरील कीर्तने इत्यादी. जेणेकरून तुमचं मन हे प्रसन्न आणि आनंदी राहील. मी माझ्यावेळेस youtube वरील अध्यात्मिक कीर्तने, माझ्या आवडीच्या नेत्यांची चरित्रे अधून मधून ऐकत असे ज्याने मनासदेखील स्फूर्ती येते. खरंतर ह्या सर्व सवयीं आपलं मन स्थिर आणि प्रसन्न ठेवण्याचं काम करतात. काहीबाही कानावर पडण्यापेक्षा काहीतरी पॉझिटीव्ह पडावं हाच ह्यामागील उद्देश असावा. पण उद्देश काहीजरी असला तरी ह्या गोष्टी तुमच्या चित्तवृती स्थिर करण्याच्या नक्की कामी येतात.

तुमचं मन आनंदी ठेवण्यास तुम्ही मनाला आनंद देणाऱ्या हलक्या फुलक्या किंवा तुमच्या आवडीच्या सिरिअल्स देखील पाहू शकता. जसं की मी रोज दुपारी आडवी होताना नेटफ्लिक्सवरील ‘big bang theory’हा शो एन्जॉय करायचे. असा विनोदी हलका फुलका तुमच्या आवडीचा कोणताही शो किंवा तशा स्वरूपाच्या movies देखील तुम्ही एन्जॉय करु शकता. रात्री झोपण्यापूर्वीदेखील मी आणि श्री असे विनोदी pictures एकत्र एन्जॉय करायचो किंवा कधी कधी ‘cheaper by the doezen’ सारखी पुस्तकं एकत्र वाचायचो. लक्षात ठेवा मन प्रसन्न ठेवणं हा हेतू आहे त्यामुळे फार स्ट्रेसफुल वाटेल अशा गोष्टीं बघणं किंवा वाचणं टाळा.

Read More : प्रेग्नन्सीमध्ये नक्कीच पाहा हे सिनेमे

गर्भसंस्कार संगीत | Listening Garbhsanskar music

ह्याचबरोबर मन आनंदी ठेवण्यास संगीतसुद्धा गुणकारी आहे. ज्यांना वाचन फार आवडत नाही ते संगीतावर भर देऊ शकतात. तुम्ही तुमच्या आवडीची गाणी,तंतूवाद्य असलेलं शास्त्रीय संगीत किंवा श्री. बालाजी तांबे ह्यांचे गर्भ संस्कार म्युझिक देखील ऐकू शकता. Youtube वर देखील बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहे त्या तुम्ही सहज ऐकू शकता ,काम करताना मागे लावून ठेवलं तरी चालतं.सहज आपल्या कानावर संगीत पडतं किंवा झोपताना ऐकणं एक्दम चांगलं.त्याचा छान फायदा होतो .

गर्भसंस्कार वर्ग | Garbhasanskar Classes

तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गर्भ संस्कार वर्ग जॉईन करू शकता तिथे अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात .बालाजी तांबे किंवा वामनराव पै ह्यांचे गर्भसंस्कार ह्यावर आधारित चांगले कोर्सेस आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता.

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी | Things to avoid by pregnant woman

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी तर गर्भवतीने हॉरर किंवा मनावर ताण येणारे किंवा मनावर दडपण आणणाऱ्या गोष्टी पाहू नये किंवा वाचू नये .साधारण अशा गोष्टीने रक्तदाब वाढण्याचा संभव असतो अशा कोणत्याही गोष्टी गरोदर स्त्रीने करू नये ह्या दिवसात जरा आपली काळजी घ्यावी .

ह्या व्यतिरिक्त गरोदर स्त्रिया आपल्या गर्भातील बाळासोबत गर्भ संवाद वाचू शकता ह्या साठी खालील पोस्ट नक्की
वाचा:

Read on : गर्भावस्थेत गर्भसंवाद कसा साधावा?

सारांश | conclusion

ह्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल, तुमच्यावरील ताण कमी होईल व तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील अशी गोष्ट करण्याची सवय ठेवली तर त्याचा तुम्हाला व तुमच्या बाळाला नक्कीच फायदा झालेला आढळेल. आणि तुमचा हा प्रवास आणखी सुलभ होईल.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

लगेच खरेदी करा अमेझॉनवर लागणाऱ्या गोष्टी

गर्भसंस्कार music cd

कर्णावर आधारित मृत्युंजय

श्रीकृष्णावर आधारित युगंधर

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!