बाळंतपणात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? आईसाठी संपूर्ण मार्गदर्शक Effective ways to deal with Postpartum Depression

बाळंतपण म्हटलं कि एक गोष्ट बऱ्याच स्त्रियांना जाणवते ते म्हणजे हळवेपण .हो बऱ्याच मुलींना हा अनुभव येतो .पण normally आपण अशा गोष्टी बोलत नाही .एकमेकींना सांगत नाही किंवा आई होणं हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे हि गोष्ट आपल्याला माहित असते .पण मग तरीही का असं होत आहे हा प्रश्न आपल्याला पडतोच .मग आपल्याला काय नक्की होतंय हे कळत नाही आणि आपण आणखी confused व emotionally drained होतो पण काळजी करू नका हे सगळं नॉर्मल आहे .ह्यात घाबरण्यासारखं काहीच नाही .ह्यातून overcome कसं कराल हे जाणून घेण्यासाठी वाचा माझा ब्लॉग .मी हि ह्या अनुभवातून गेले आणि मला काय जाणवलं हे मला तुमच्या सोबत शेअर करायला नक्कीच आवडेल

This post talks about mental health during postpartum period. It also answers the questions about postpartum depression, mental health during postpartum period and ” balantpanat manasik swasthya kase japave ?” etc

ह्या दिवसात काही जणींना थोडी चिडचिड होऊ शकते किंवा मन हे अतिशय भावुक किंवा हळवं झाल्यासारखं वाटतं. सगळ्यांचं मुलींना होतं असं नाही. पण थोडयाफार प्रमाणात हा फरक बऱ्याच मुलींना जाणवत असेल.

हे पाहा नाही म्हटलं तरी तुमचं आयुष्य change झालंय. पहिले तुम्ही तुमचं असं जग होतं. आता त्यात एक छोटा जीव आलाय जो सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. हे feeling वेगळं आहे. हे जितकं छान आहे तितकंच overwhelming देखील आहे. आणि त्यात hormones नी घातलेला कहर. त्यामुळे तुम्ही एका physical च नाही तर emotional change मधून पण जात आहात . Its all normal. तुम्ही काही वेगळे नाहीयात. बऱ्याच मुलींना असं होतं.

Table of content

असं का होतं? | Why does emotional changes happen during postpartum ???

बाळंतपण म्हटलं कि ह्यात Hormones थोडं बदलत असतात. त्यातून तुम्ही आई झाल्यावर काळजी करण्याचा एक बदल निसर्गतः आईच्या स्वभावात होतो. त्यामुळे देखील थोडंसं overwhelme होणं. थोडंसं नेहमी पेक्षा जास्त भावनाशील होणं, हळवं होणं हे सगळं नॉर्मल आहे. कदाचित प्रत्येकीलाच असं होईल असं नाही पण बहुतांश मुलींमध्ये हा फरक त्यांना जाणवेल.

जर गरजेपेक्षा जास्त होतं असेल, depressing वाटतं असेल तर ते postpartum depression असू शकतं. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणे बोला.

आपल्याकडे आपण कोणत्याही गोष्टीला परदेशातील गोंष्टींसारखी लेबल लावत नाही .म्हणजे तशी सवय आपल्याला नसते म्हणून ती गोष्ट नसतेच असं नाही .मानसिक होणारे बदल आपण स्वतःच मूड swings म्हणून झटकतो .पण बाळंतपणात येणार हळवेपणा हा गरजेपेक्षा जास्त असेल तर तो नाकारू नका ,आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणे बोला.त्यातून नक्कीच मार्ग निघेल .

आजकाल बऱ्याच मुलींना हि गोष्ट जाणवते .आपल्या सगळ्यांच्या माहितीतील प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डी देखील ह्या विषयावर भरभरून मनमोकळं करताना दिसते.लक्षात आई होणं हि खरंच आनंदाची गोष्ट आहे पण प्रसूतीनंतर आपल्या आयुष्यात होणारे बदल ,आपल्यात होणारे मानसिक बदल ,भावना आणि त्याची गुंतागुंत ह्यातून आपण जात असताना आपण संपूर्णपणे ते दुर्लक्षित करणे किंवा अमान्य करणे चुकीचे ठरेल .बघुयात हि अभिनेत्री काय म्हणते .

समीरा रेड्डी ह्यांचे shethepeopletv वर आलेले पोस्ट मराठी मध्ये भाषांतरित
” Postpartum Depression हे मातांमध्ये सर्वसाधारण आहे .पण क्वचितच ते मान्य होते.बाळ झाल्यानंतर मातांना बाकी काही नाहीतर केवळ आनंद जाणवला पाहिजे असं अपेक्षित असतं,पण मानसिक आरोग्य त्याप्रमाणे काम करत नाही .त्यामुळे आपण जागृत होऊयात आणि अशा स्त्रियांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत करूयात .
समीरा रेड्डीने आपला अनुभव सांगताना असं म्हटलं कि ह्या पोस्ट मध्ये शेअर केलेले माझे pics मी माझ्या लो मूड वर असतानाचे आहेत .मी माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर कितीही प्रयत्न केला तरी आनंद जाणवू शकत नव्हते .ह्या क्षणांचा मी अजूनही विचार करते आणि त्यामुळे मला अशा लोकांपर्यंत कळकळीने पोहोचवसे वाटते ज्यांना आता स्वतः बद्दल चांगलं वाटत नाहीये .तुम्ही एकटे नाही आहात.आणि कठीण काळात एकमेकांसाठी असणं देखील महत्वाचं आहे .

सगळ्यांच्या बाबतीतच बाळंतपण म्हटलं कि होईल असं नाही.बऱ्याच जणींना थोडं फार जाणवेल पण गरजेपेक्षा जास्त जाणवत असल्यास ह्या गोष्टींना ignore करू नका .स्वतःची काळजी घ्या .

बाळंतपण म्हटलं कि विश्राम देखील महत्वाचा !!!त्यासाठी काय कराल ???तुमचं routine कसं बसवलं पाहिजे ???काही महत्वाच्या टिप्स .ह्यासाठी माझं हे ब्लॉगपोस्ट नक्की वाचा !!खाली लिंक शेअर केलेली आहे !!

Read More : बाळंतपणात विश्राम कसा घ्याल ??

ह्या सगळ्या emotional change ला कसं cope up कराल? | How to cope up with postpartum emotional changes and up downs???

Reading :

हो जसं प्रेग्नन्सी दरम्यान पुस्तकं आपण वाचतो, मन प्रसन्न ठेवण्यासाठी तसंच बाळंतपणात देखील पुस्तकं वाचू शकता. छान novels, कथा तुमच्या आवडीची पुस्तकं आवर्जून वाचा. हा वेळ तुम्हाला कधी मिळेल? Breastfeeding दरम्यान बराच वेळ असतो. नुसतं बसून पाजण्यापेक्षा एखादं छान पुस्तकं वाचत पाजलं तर तुम्हाला पण आनंद मिळेल. किंवा बाळ झोपल्यावर त्याच्याशेजारी पडून पुस्तकं वाचली तर तुम्हाला देखील डोळे गुंगून झोप येईल. अर्थात पाहिले काही दिवस थकव्यामुळे डोळ्यावर ताण नको. पण नंतर नक्कीच करुन पाहा. तुम्ही चांगली self help books सुद्धा वाचू शकता. कारण आता तुम्हाला mangement ची खूप गरज पडणार आहे.

Netflix

हो हा सुद्धा चांगला option आहे. Breastfeeding दरम्यान एखादी छान series किंवा चांगला movie पाहू शकता. किंवा youtube वरील चांगले videos पाहू शकता. अर्थातच पहिल्या काही दिवसा नंतर.

दिवसातून स्वतःसाठी वेळ

अर्थातच आता बाळ ही आपली कायमस्वरूपी priority आहे. तरीदेखील दिवसातून थोडावेळ स्वतः साठी काढा. छान पाय मोकळे करा. खिडकीत बसून चहा enjoy करा.कधीतरी एक दिवस सगळ्यांसोबत जेवण enjoy करा जे बाळंतिणी ला पहिले महीने फारसं नाही मिळत कारण बाळ झोपलं कि आधी पटकन बाळंतिणीचे जेवण उरकतात.

माहेर enjoy करा

हो हे काही वेगळं सांगायला नको. खूप दिवसांनी तुम्हाला एकुणच असा निवांत वेळ मिळणारे. तो तुमच्या जवळच्या माणसांसोबत spend करा. मी तर बाळ झोपलं कि रात्री एक तरी सात आठ चा डाव बहिणीसोबत किंवा बाबांसोबत खेळत असे आणि मग झोपत असे.

Meditation

हा सुद्धा एक छान option आहे. दिवसातून कमीतकमी 5 मिनिट मेडिटेशन करा. किंवा एक तरी जपाची माळ ओढा. खूप छान वाटेल

हा वेळ सर्वस्वी तुमचा आहे. तुमची शारीरिक झिज भरून काढणं आणि मानसिक स्वास्थ जपणं ह्या दोन्ही गोष्टीवर focus करा.

जवळची माणसं तुम्हाला समजून घेतीलच.

Spouse साठी विशेष | Special advice for spouses

तुमची बायको खूप मोठया transition मधून जात्ये. अर्थात तुम्ही वडील झाला आहात तुमच्यावर जवाबदारी वाढलीये. तुमच्या दोघांसाठी हा बदल आहे. तरीही ह्या काळात तिला समजून घ्या.तिला दुखवू नका. पूर्वीसारखा नाही पण बाळंतपण असलं तरिही कधीतरी चांगला time spend करा. एकत्र movie म्हणा किंवा पत्त्यांचा game किंवा तीन महिन्यानंतर एखादं घरी का असेना छान dinner एन्जॉय करा. जेवढं तुमचं relationship strong होईल आईबाप झाल्यानंतर तेवढं तुमच्या बाळाच बालपण आणि पुढचं आयुष्य हे चांगलं असणारे.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

So keep enjoying !!!!stay happy !!!

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

📘 आईसाठी जर्नल्स – मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शक डायऱ्या

💆‍♀️ मन:स्वास्थ्य, भावना समजून घेणे आणि आत्म-देखभाल यासाठी सुंदर पद्धतीने डिझाइन.
🟢 मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी.

📚 मातृत्व आणि मानसिक आरोग्यावर उत्तम पुस्तके

🧠 आई झाल्यावर मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांचं वास्तवदर्शी चित्रण — समजून घेण्यासाठी उत्तम.
🟢 पोस्टपार्टम डिप्रेशन, चिंता याविषयी उघड बोलणारी प्रेरणादायक पुस्तिका.

🌿 बाळंतपणानंतर शरीर आणि मन दोन्ही सावरण्यासाठी एक सर्वांगीण मार्गदर्शक.
🟢 प्रत्येक आईने वाचावी अशी holistic उपचारपद्धती.

🩺 बाळंतपणानंतरचा थकवा, चिडचिड, मानसिक थकवा यावर वैद्यकीयदृष्ट्या आधारित उपाय.
🟢 संपूर्ण आरोग्य पुनःप्राप्तीसाठी.

🔥 थोडं विनोदी, थोडं खमकी — पण मनाला दिलासा देणारं.
🟢 “मी एक चांगली आई आहे” – हे स्वतःला रोज सांगायला मदत करणारं पुस्तक.

Postpartum Mental Health – FAQs (मराठीतील माहिती)

बाळंतपणानंतर मानसिक आजार होण्याची शक्यता असते का?

होय. अनेक महिलांना बाळंतपणानंतर मानसिक आजार – जसे की पोस्टपार्टम डिप्रेशन, चिंता, आणि मूड स्विंग्स – याचा अनुभव येतो. हे हार्मोनल बदल, झोपेचा अभाव, आणि मानसिक ताण यामुळे घडू शकते.

प्रश्न: पोस्टपार्टम ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यामध्ये काय फरक आहे?

पोस्टपार्टम ब्लूज हे सौम्य स्वरूपात असते, सहसा प्रसूतीनंतर २-३ दिवसांत सुरू होते आणि २ आठवड्यांत आपोआप थांबते.

पोस्टपार्टम डिप्रेशन हे अधिक तीव्र आणि दीर्घकालीन असते. यासाठी वैद्यकीय मदत आवश्यक असते.

पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणं कोणती?

सतत दु:खी वाटणे किंवा रडू येणे

झोपेचा त्रास

आत्मगौरव कमी होणे

बाळाविषयी उदासीनता

चिडचिड, घाबरणं, भीती वाटणं

“मी चांगली आई नाही” असे वाटणे

उपचार घेण्याची गरज कधी आहे?

जर ही लक्षणं २ आठवड्यांहून अधिक काळ राहतात, तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असतील, किंवा आत्महानीचे विचार येत असतील — तर त्वरीत मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मी काय करू शकते?

स्वतःशी प्रामाणिक रहा आणि आपले अनुभव शेअर करा.

नित्यक्रम ठेवा – झोप, आहार, थोडा वेळ स्वतःसाठी.

जर्नल लिहा किंवा योग्य मार्गदर्शक पुस्तकं वाचा.

समुपदेशक, गटचर्चा, किंवा थेरपिस्ट यांचं मार्गदर्शन घ्या.

कुटुंब आणि जोडीदाराकडून पाठिंबा मागा.

3 thoughts on “बाळंतपणात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? आईसाठी संपूर्ण मार्गदर्शक Effective ways to deal with Postpartum Depression”

  1. Pingback: बाळावर गर्भ संस्कार कसे करावेत? » Humbaa - Tech For All

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *