This post talks about what kind of preparation needs to be done after delivery?? what kind of newborn clothing is required?? and what are useful tips that you can use in this preparation.This post answers questions like “balantpanasathichya kapdyanchi tayari, balachya kapdyanchi tayari kashi karal?”
बाळ आलं म्हणजे त्याच्या मागे बरेच कपडेदेखील आले. बाळाची आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची हौस मौज आली. त्याला ह्या नवीन जगात आल्यावर ऊबदार वाटावं ह्या दृष्टीने आपण त्याच्या कपड्यांची तयारी करतो.तेव्हा बाळंतपण म्हणजे साधारण नववा लागून गेला आणि डिलीव्हरी जवळ आली म्हणजे बाळ बाळंतिणीला लागणारे कपड्यांची तयारी तुम्हाला आई आजी म्हणून करून ठेवावी लागेल. बाळंतपणात कपडे आणि खासकरून बाळाचे कपडे हे अगदी इम्पॉर्टन्ट मॅटर आहे .
Table of Content
कशी तयारी कराल? | How to prepare for Indian postpartum clothing for mom and baby ??
आजीची तयारी | Postpartum Clothing Prep before delivery
बाळंतपण म्हणजे नाही म्हटलं तरी तुम्हाला हवीहवीशी वाटणारी जवाबदारी. डिलिव्हरीला न्यायच्या तयारी पासून पुढचे काही दिवस बराच संसार तुम्हाला मांडावा लागेल. आता नववा चालु झालाय. काही दिवसात डिलीव्हरी येऊन ठेपेल. मुलीच्या काळजीत तुम्ही असाल. पण आता कपड्यांची तयारी करावयास हरकत नाही.
ती तयारी तुम्ही काय कराल?
गुंडाळी कापडे | Indian Swaddles for Babies
- गुंडाळी कापडे :नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला पुढचे काही महीने गुंडाळावं लागतं. इंग्लिशमध्ये त्याला baby swaddling असं देखील म्हणतात. गुंडाळलं की बाळ छान झोपतं. त्याला आईच्या पोटात आहोत अशी उब मिळते. तेव्हा ही गुंडाळी कापडे तुम्हाला तयार करून ठेवावी लागतील.
- साधारण कॉटनच्या वापरलेल्या साड्यांची ही कापडं बनवतात. तुमच्या वापरलेल्या मऊ झालेल्या कॉटन च्या साड्या काढून ठेवा. आजकालच्या बायका फारशा अशा साड्या वापरत नाहीत तरी तुमच्या आईच्या, काकवांच्या, ओळखीच्या बायकांच्या घ्यायला हरकत नाही. अशा कॉटनच्या मऊ साड्या dettol च्या पाण्यातून काढून स्वच्छ धुऊन घ्या.
- नंतर त्यांचे मोठे तुकडे करा. साधारण एका सहावारीत दोन मोठे व, एक लहान असे तुकडे बनतील.
- मोठे तुकडे तुम्ही गुंडाळी कापडं म्हणून वापरू शकता. लहान तुकडे बाळाला अंथरायला व इतर गोष्टीं साठी उपयोगी येतील.
- पंजाबी ड्रेस वरच्या वापरलेल्या कॉटनच्या मऊ ओढण्या देखील डेटॉल मधून काढून गुंडाळी कापडे म्हणून वापरता येतील.
- बाळाचे अंग पुसायला:मगाशी म्हटल्या प्रमाणे हे मऊ कॉटनची गुंडाळी कापडं बाळाची अंगपुशी म्हणजे एक प्रकारचा टॉवेल बाळासाठी म्हणून वापरू शकता. खरंतर बाळाची त्वचा नाजूक असल्याने हीच कापडे बाळाचे अंग पुसायला वापरतात. साधारण दोन कापडे ह्या साठी राखीव ठेवा.
- दुपटी :बाळाला अंथरायला म्हणजे खाली घालायला दुपटी लागतात. वेगवेगळ्या रंगाची, चॉकलेट, भिरभिरे, फुलपाखरू अशी design वापरून घरी शिवलेली, किंवा colorful कापडांची प्लेन दुपटी वापरतात. किंवा वापरलेल्या कॉटनच्या साड्यांचे वरील प्रमाणे तुकडे टीप मारून देखील मऊ दुपटी म्हणून वापरता येतात.
- लाळेरी:बाळ लहान असल्याने लाळ किंवा दही फार काढते. त्यातून ज्याचे ओकरे बाळसे असते त्यांचे विचारायलाच नको. तेव्हा तुम्हाला लाळेरी बरीच लागतील. बाजारातील readymade लाळेरी ही बाळ थोडं मोठं झालंकी उपयोगी येतील. तोसवर कॉटनच्या साड्यांचे उरलेल्या तुकड्यांचे,किंवा एखाद्या जुन्या ड्रेसचे रूमाला एवढ्या साईझचे तुकडे करुन वापरायला हरकत नाही.
- पोटपट्टा: आईसाठी पहिले काही महीने पोट आत जाण्यासाठी अंगलावणी नंतर पोट पट्टा वापरण्याची पद्धत आहे. आता बाजारात readymade असतो. पण माझ्यावेळेस आईने दोन जुन्या कॉटनच्या मऊ वापरलेल्या अक्ख्या साड्या डेटॉल मध्ये धुऊन राखीव ठेवल्या होत्या.त्या मी पोटपट्टा म्हणून वापरत होते.
बाळाचे कपडे | Indian Clothing for newborn baby
- ऋतुमानानुसार, घालायला सोपे कारण फॅशनपेक्षा बाळ नुकतंच असतं आणि हाताळायला अगदी पहिले दिवस नाजूक असतं ह्या गोष्टी लक्षात ठेवून निवडा.
- Tops:
- झबली :बाळाला अंगात घालण्यासाठी कॉटनची शिवलेली मऊ ऊबदार झबली तुम्ही वापरू शकता.
- होजियरी टॉप्स :घालायला सोपे नाड्यांचे टॉप्स ,पुढून बटण असलेले टॉप्स , डोक्यातून घालायचे सुटसुटीत onesies असे आणुन ठेवू शकता.
- बंडी:कॉटनच्या मऊ बंडया देखील उत्तम. सुटसुटीत आणि घालायला सोप्या.
- पेटी :फ्लॅनेलच्या किंवा कॉटनच्या पेट्या देखील छान.
- Bottoms:लंगोट :होजियरीचे मऊ किंवा कॉटनचे मऊ वापरलेले लंगोट डेटॉल मध्ये धुऊन आणुन ठेवा. साधारण दोन डझन लंगोट तरी तयार असावेत.
- हातमोजे :बाळ नुकतेच जन्मले असले तरी त्याला नखे असू शकतात. आणि कापली तरी ती भराभर वाढतात. किंवा त्यांना ती तोंडावर मारायची सवय असते. तेव्हा तसं होऊ नये म्हणून हातमोजे वापरू शकता. पण बाळ तोंडात बोटं घालायला लागलं की असं काही न वापरणं योग्य. बाळ तोंडात बोटे घालणं natural आहे. आणि ते हातमोजांसकट घालत असेल तर त्यातून infection होऊ शकतं.
- पायमोजे:थंडीत उपयोगी ठरु शकतात.
- टोपडी /caps : बाळाला कान आणि डोक्याला हवा लागू नये.
- स्वेटर:थंडीचे दिवस असतील तर अंगात घालायला, टोपडं, मोज्यांचा सेट घेऊन ठेवा.
- बाळाचे पांघरूण :
- Baby blanket:बाळाला उब मिळावी ह्यासाठी पांघरूण म्हणून आणुन ठेवा.
- साडी :कॉटनची वापरलेली मऊसूद साडी देखील पांघरायला छान आहे.
बाळाचे कपडे कसे धुवाल ?? | How to clean baby clothes??
लक्षात ठेवा बाळाचे कपडे हे नवीन जरी असले तरी मऊ असावेत. Dettol मधून काढल्याशिवाय वापरायचे नाहीत. थोडंसंच डेटॉल घालून धुवा. शु ची वेगळी बादली व शी च्या कपड्यांची वेगळी ठेवायची.वेळ झाला कि पाण्यात काढून शु चे machine ला सेपरेट काढायचे आणि शी चे लगेच हातानी धुणं शक्य नसल्यास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि हात मोकळा झाला कि धुवायचे .कमोड च्या हॅन्ड शॉवर वर शी स्वचछ करून घेतली कि लगेच flush होते .मग पाण्यात भिजवून machine ला देखील लावता येतात .
Read More : बाळंतिणीला कसा आहार द्याल ?
मावशीची तयारी | Things to buy from readymade store or online for postpartum clothing
घरी बाळ येणार म्हटलं कि आणखी एक व्यक्तीं अतिशय खूष असते त्या म्हणजे बाळाच्या मावश्या. माझ्या बाळाला देखील त्यांचं प्रेम खूप लाभलंय. आणि मला देखील त्यांची माया खूप मिळालीये. आपल्या आई बाबांचा आपल्यावर जीव असतोच पण भावंडांचा असणं हा देखील वेगळाच आनंद असतो. तेव्हा मावशांनी काय तयारी करावी लागेल?
- Diapers: घरात येणाऱ्या बाळाला diapers ची गरज भासणारे. तुमच्या बहीणीला नुकतंच झालेलं बाळंतपण आणि टाके ह्यात अशा गोष्टी करणं कदाचित जमणार नाही. तेव्हा बाळाच्या diaper ची तयारी करावी लागेल. त्यात कोणता ब्रँड आणि बाळाच्या weight नुसार त्या साईझ मधील diapers आणुन ठेवा. पाहिले काही दिवस newborn baby diaper आणावं लागेल.
- Baby wipes :बाळाची शी पुसायला तुम्ही फडकी वापरू शकता. पण सध्या ह्याला baby wipes हा एक ऑपशन आहे. हे wipes अतिशय soft असून बाळाची शु शी काढायला त्याचा चांगला उपयोग होतो. तेव्हा ते देखील आणुन ठेवा.
- ड्राय मॅट :बाळाच्या शु चा ओलेपणा शोषून घ्यायला ह्याचा खूप उपयोग होतो. मग नुसतं दुपटं बदललं कि कामं होतं. तेव्हा साधारण दोन तरी आणुन ठेवा.
- आईचे कपडे :तुमच्या बहीणीसाठी मॅटर्निटी वेअर शॉपिंग करायला जा. नवव्या महिन्यात तिला नंतर वापरायचे breastfeeding टॉप्स, त्या पद्धतीचे इंनर्स खरेदी करायला तिला मदत करा.
- मॅटर्निटी सॅनिटरी पॅड्स :पुढील काही दिवस अंगावर जात असल्याने गरज पडेल.
तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!
अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
Pampers.com “Essentials for Newborn”
MommyOnPurpose.com “What To Wear Postpartum: Cute (Comfy) Clothes For New Moms”
👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
👶 बाळासाठी आवश्यक वस्तू:
- नवजात बाळाचे कपडे
- झबले, मिटीन्स, कॅप्स इत्यादी.
- उदाहरण: “TuddyBuddy 100% Cotton Multi Color Tops/Rompers/Bodysuits for Baby Boy & Baby Girl”
- स्वॅडल ब्लँकेट्स
- बाळाला सुरक्षित आणि उबदार ठेवणारे स्वॅडल ब्लँकेट.
- उदाहरण: “SwaddleMe Original Swaddle“
- बाळाचे डायपर्स
- बाळाच्या हॅन्डलिंगसाठी आवश्यक.
- उदाहरण: “Pampers Swaddlers Diapers“
- बेबी वाइप्स
- बाळाच्या त्वचेवर सौम्य साफसफाईसाठी.
- उदाहरण: “Himalaya Nature Touch Water Baby Wipes”
- बेबी पावडर आणि तेल
- बाळासाठी पावडर आणि तेल.
- उदाहरण: “Himalaya Baby Powder“ किंवा “Parachute Advansed Baby Massage Oil for New Born“
👶 प्रसूती आणि मॅटर्निटी आवश्यक वस्तू:
- मॅटर्निटी पिलो (Pregnancy Pillow)
- गंधी आणि पाठीला आराम देणारा पिलो.
- मॅटर्निटी कपडे
- गर्भवती महिलांसाठी आरामदायक, श्वास घेणारे कपडे.
- प्रसूती सपोर्ट बॅंड
- पोट आणि पाठीला समर्थन देणारे बॅंड.
- नर्सिंग ब्रा (मॅटर्निटी ब्रा)
- स्तनपानासाठी योग्य ब्रा.
नवजात बाळासाठी स्टार्टअप किट
- समाविष्ट: बोडीसूट्स, स्वॅडल्स, मोजे, टोपी व ग्लोव्हज.
- उद्दिष्ट: नवजात बाळासाठी सर्व आवश्यक वस्तू एकत्र.
आई व बाळासाठी हॉस्पिटल बॅग वस्तू
- समाविष्ट: नर्सिंग नाईटगाऊन, आरामदायक गाऊन, बाळाचे झोपण्यासाठी कपडे व स्वॅडल ब्लँकेट्स.
- उद्दिष्ट: हॉस्पिटलसाठी पूर्ण तयारी.
🍼 बाळ व आईसाठी कपड्यांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. नवजात बाळासाठी कोणते कपडे आवश्यक असतात?
नवजात बाळासाठी मऊ कॉटनचे बोडीसूट्स, झिपर स्लीपर्स, स्वॅडल ब्लँकेट्स, टोपी, मोजे आणि ग्लोव्हज आवश्यक असतात. त्वचेला चिडचिड न होणारे, सौम्य कपडे निवडावेत.
बाळासाठी किती कपड्यांची तयारी करावी?
सुरुवातीला ५-७ बोडीसूट्स, ४-५ झोपायचे कपडे, ३-४ स्वॅडल ब्लँकेट्स, व २-३ टोपी-मोजे सेट्स असावेत. बाळ लवकर कपडे खराब करतो, त्यामुळे जास्त कपडे तयार ठेवावेत.
बाळाच्या कपड्यांसाठी कोणत्या प्रकारचा कापड योग्य आहे?
१००% ऑर्गेनिक कॉटन किंवा सौम्य व श्वास घेणारे फॅब्रिक सर्वात योग्य असते. रासायनिक रंग किंवा कडक कापड टाळावे.
आईसाठी बाळंतपणानंतर कोणते कपडे आवश्यक असतात?
नर्सिंग नाईटगाऊन्स, पोस्टपार्टम गाऊन, नर्सिंग ब्रा, आरामदायक लॉन्जवेअर, व बेली सपोर्ट बेल्ट/अंडरवेअर बाळंतपणानंतर उपयोगी पडतात.
बाळाचे कपडे कसे धुवावे?
बाळासाठी सौम्य, सुगंधमुक्त व हायपोअलर्जेनिक डिटर्जंट वापरावे. कपडे वेगळे धुवावेत आणि थेट उन्हात वाळवावेत.
बाळासाठी फॅन्सी कपडे घालावेत का?
बाळासाठी फॅन्सी कपडे विशेष प्रसंगांसाठी वापरू शकता, पण दररोजच्या वापरासाठी साधे, मऊ आणि आरामदायक कपडेच योग्य आहेत.