ह्या माझ्या आजी लोकांसाठी खास लिहिलेल्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत बाळंतपणाची तयारी कशी करावी ??प्रसुतीपूर्व बाळंतपण तयारी म्हणजे नक्की काय ???बाळंतपण म्हणजे नक्की काय ??बाळंतपण जवळ आले म्हणजे लेकी सुनेसाठी नक्की काय तयारी करावी ??तुमच्या ह्या ‘balantpan tayari ‘,व ‘balantpan dakhva ‘आणि ह्या ‘balantpan tayari kashi karavi’ सर्व प्रश्नाची उत्तरे मी लिहीत आहे माझ्या ह्या खास पोस्ट मध्ये!!
आता जसा नववा महिना सरत चाललाय तसं नवीन येणाऱ्या बाळाची ओढ ही सर्वांनाच लागलेली असते. नवीन येणार चिमुकलं बाळ कसं असेल ह्याची curiosity ही सर्वांनाच असते आणि हा आनंद निराळाच असतो. पण एक व्यक्ती तेव्हा थोडी काळजीत असते ती म्हणजे मुलीची आई जे की साहजिकच आहे तिला तिची वेळ आठवत असते आणि आपली मुलगी ह्यात सुखरूप पार पडू दे ह्याची ती मनोमन इच्छा करत असते. काळजी करू नका सगळं नीट होणारच आहे. पण तुम्ही त्यासाठीची थोडीफार तयारी करून ठेवा. साधारण पॉईंट्स मी आमच्या अनुभवातून मांडत आहे.
Table of Content
आजीची बाळंतपणाची तयारी | Balantpan tayari
बाळ बाळंतिणीचे कपडे | Traditional baby mom clothing :
मुलीला प्रसूतीसाठी निघताना, नंतर हॉस्पिटलमध्ये वापरायचे कपडे, बाळाच्या कपड्यांची तयारी करून ठेवा. डेटॉलच्या पाण्यात काढून धुऊन स्वछ ठेवा. बाळंतिणीच्या खोलीत वापरायच्या बेडशीटस, पांघरुणे, अंगलावणी साठी वापरायची कापडे सगळं स्वछ धुऊन ठेवा. कपडयांची काय तयारी करायची हे माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये नमूद केलय.
बाळासाठीचे ,बाळाच्या आईसाठीचे लागणारे कपडे मी माझ्या खालच्या पोस्ट मध्ये नमूद केले आहेत त्यांची तयारी करायला हरकत नाही ,लक्षात ठेवा पूर्वी चाळ संस्कृती नांदायची त्यामुळे अशी तयारी आधी करून ठेवायची गरज कोणाला भासली नाही पण आता तसं नाही तेव्हा आधीपासून तयारी करायला हरकत नाही .खालच्या लिंक वर तुम्हाला बाळंतपण कपडे तयारी काय करायची हे संपूर्ण मुद्देसूद उत्तर सापडेल .नक्की वाचा आणि प्रतिक्रिया सांगा .
Read more : बाळंतपणात कपड्याची काय तयारी कराल ??
अंगाला लावणारी बाई | Angala lavnari bai :
बाळ आणि बाळंतिणीस अंगाला मालीश करणे, अंघोळ, धुरी, शेक शेगडी करणे ह्या सगळ्याची नितांत गरज असते. त्यासाठी एखादी ओळखीतील बाई सांगून ठेवा. ह्या बायका सध्या खूपच डिमांडमध्ये आहेत. तेव्हा तुमच्या वेळेला त्या available असणं देखील गरजेचं आहे. तर आता साधारण नववा लागला आहे तर एखाद्या बाईला बोलून ठेवा. साधारण बाळ आणि बाळंतीण घरी आले कि दुसऱ्या दिवशी ती हजर होइल अशी व्यवस्था ठेवा. बाळासाठी आणि बाळंतिणीसाठी मालिश हे खूप गरजेचे आहे तेव्हा त्यात हयगय नको.शेक शेगडी हि तब्येतीसाठी फायदेशीर असते आणि वाढीसाठी चांगली .त्यासाठीचा कोळसा ,घमेलं आणून ठेवा .शेक शेगडीसाठी कोळसा कसा पेटवायचा ते वाचा खालच्या लिंक वर .संपूर्ण मिनी गाईड चित्रांसोबत दिलेलं आहे .
Read More : शेक शेगडीसाठी कोळसा कसा पेटवणार ??
बाळंतपणाची तयारी म्हणजे मानसिक तयारी | Mental preparation before delivery:
तुमच्या मुली /सुनेशी डिलीव्हरी बाबत थोडी चर्चा करा. तिला धीर द्या. काही टिप्स द्या. आणि हो नॉर्मलचाच आग्रह धरू नका. तेव्हा जे योग्य असेल त्यानुसार डॉक्टर निर्णय घेतीलच. ह्या बाबत माझ्या घरच्यांनी तसा कोणताच आग्रह धरला नाही.
धार्मिक | Religious customs for postpartum:
प्रसूतीसाठी निघताना जे काही धार्मिक संस्कार असतील त्याची माहिती करून घ्या.निघताना देवासमोर दिवा लावण्याची, गर्भवतीची ओटी भरण्याची पद्धत असते. प्रसूती झाली कि बाळ बाळंतीण हॉस्पिटल सोडताना ज्या पाळण्यात बाळाला ठेवलेलं असतं त्यात नारळ व बर्फी किंवा पेढ्यांचा बॉक्स ठेवण्याची पद्धत आहे. तसंच तेथे कामं करणाऱ्या स्त्रियांसाठी पैसे देण्याची पद्धत आहे हा त्यांचा मान समजला जातो. बाळ बाळंतीण घरी येताना दारात औक्षण करण्याची,तांदूळ पाणी बाळबाळंतिणीवरून ओवाळून टाकण्याची किंवा भाकरीच्या तुकड्याने ओवाळून टाकण्याची पद्धत आहे.
घरात सामान भरून ठेवा | groceries shopping:
बाळंतपणाची तयारी म्हणजे बाळंतपणासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक सामानाची आणि घरातील नेहमीच्या सामानाची यादी करून सामान भरून ठेवा. ऐनवेळी घरात अमुक एक संपलय म्हणून धावपळ नको. बाळंतीणीस लागणारे लिंबाचे लोणचे घालून घ्या. डिंक, बाळंतशोपा अशी तयारी करून ठेवा.
आजोबांचा हातभार | Necessary things
घर आवरणे | cleaning a house before baby comes:
घरी बाळ येणार म्हणजे पसारा हा होणारच. तरीदेखील घर स्वच्छ राहील ही जवाबदारी घरातील सर्व माणसांची आहे. तेव्हा आता घर आवरून ठेवा. घरातील धूळ जाळ्या साफ करून घ्या. फॅन स्वच्छ पुसून घ्या. बाळाच्या खोलीत किंवा इतर घरात डास वैगरेंचा उपद्रव होणार नाही ह्या दृष्टीने खिडक्यांना जाळ्या वैगरे बसवून घ्या. बाळ बाळंतिणीची खोली ठरवून त्यादृष्टीने तेथील सामान आवरून घ्या. अशी साधी तयारी आधी करून ठेवली तरी नंतरची धावपळ नक्कीच वाचेल.
मावशीची मदत :
घरातील खाऊ | Snacks for family members :
प्रसूतीच्या तीनचार दिवसात तुमची खूप धावपळ होणारे जे अगदी साहजिक आहे. तेव्हा तुमचा सगळा फोकस हा बाळ आणि बाळंतिणीवर असणार आहे. पण घरात शुगर असणारी मोठी मंडळी असु शकते ज्यांना थोडया थोडया वेळानी खावं लागतं. तेव्हा थोडंफार फराळाचे पदार्थ जसं की चिवडा, चकली, राजगिरा लाडू, फळं अशा गोष्टी घरात आणुन ठेवा जेणेकरून त्यांची थोडी सोय होइल आणि तुमची फार धावपळ होणार नाही.
कपडयांची हॉस्पिटल बॅग | Hospital bag packing for delivery:
डिलीव्हरी साठीची हॉस्पिटल बॅग भरून ठेवा. माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये काय पॅक करायचं हे नमूद केलेलं आहे. डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल मध्ये जाताना लागणाऱ्या आवश्यक वस्तू साधारण नववा महिना लागला कि बॅगमध्ये भरून ठेवायला हरकत नाही .आईसाठी लागणाऱ्या गोष्टी ,बाळासाठीच्या लागणाऱ्या गोष्टी ह्या सर्वांची पद्धतशीर यादी खालच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिली आहे .ती एकदा नक्की बघून घ्या .त्याची तुम्हाला नक्कीच गरज पडणार आहे .
Read More : बाळंतपणाची हॉस्पिटल बॅग कशी भरावी ??
सगळ्यांनाच सांगावेसे वाटले असे काही :
मदत | Ask for help:
ह्या दोन चार दिवसात बऱ्यापैकी घरचं करुन बाळ बाळंतिणीची काळजी घेणं व त्यांच routine लागेस्तोवर दगदग होणं साहजिक आहे. सगळ्याच आघाडयांवर तुम्हीच लढलं पाहिजे असं नाही. तेव्हा कोणी आपणुन मदत करत असेल तर मोकळ्या मनाने त्याचा स्वीकार करा. दोनचार दिवस स्वयंपाकपाण्यासाठी बाई ठेवण्यासदेखील हरकत नाही. कारण हे दिवस जागरणाचे जसे तुमच्या मुलीचे आहेत तसें तुमचे देखील आहेत. व तुमची तब्येत जर नीट राहिली तर पुढचं सगळं नीट पार पडेल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल.
असं थोडंफार विचार करून, सर्वांनाच बरोबर घेऊन, थोडीफार तयारी करून मांडणी केली व बाळंतपणाची तयारी केली तर तुमचं प्रोजेक्ट हे आणखी सुलभ होइल आणि सर्वांनाच एन्जॉय करता येईल. माझ्यावेळेस डिलीव्हरीचे दिवस झाल्यानंतर बाळंतपणात कोरोनाचे संकट उभे राहिले व lockdown मध्ये देखील काही महीने माझ्या आईनी व बहीणीने नीट पार पाडले. मैत्रिणीची मदत झाली. तेव्हा थोडीफार तयारी आणि थोडीफार मदत घ्यायला संकोच नको. All the best !!!तुमचा अनुभव आनंदमय होवो.
तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!
अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
momonthemend.com “10 Ways To Prepare for a Smoother Postpartum Recovery”
pampers.com “Understand Postpartum Period (Puerperium)”
🌸 गर्भधारणेदरम्यान वापरता येणाऱ्या उपयुक्त वस्तूंसाठी खास शिफारसी -Pregnancy Essentials
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
👶 प्रसूती आणि मॅटर्निटी आवश्यक वस्तू:
- मॅटर्निटी पिलो (Pregnancy Pillow)
- गंधी आणि पाठीला आराम देणारा पिलो.
- मॅटर्निटी कपडे
- गर्भवती महिलांसाठी आरामदायक, श्वास घेणारे कपडे.
- प्रसूती सपोर्ट बॅंड
- पोट आणि पाठीला समर्थन देणारे बॅंड.
- स्ट्रेच मार्क क्रिम आणि ऑइल्स
- स्ट्रेच मार्क कमी करणारे आणि त्वचा मऊ करणारे उत्पादने.
- उदाहरण: “Bio-Oil Skincare Oil” किंवा “Palmer’s Cocoa Butter Formula Massage Lotion”
- नर्सिंग ब्रा (मॅटर्निटी ब्रा)
- स्तनपानासाठी योग्य ब्रा.
🧴 आईसाठी वैयक्तिक स्वच्छता (Personal Hygiene):
- मॅटर्निटी सॅनिटरी पॅड्स
- प्रसूतीनंतरच्या काळात वापरण्यासाठी.
- प्रसूती सुरक्षित त्वचा देखभाल उत्पादने
- गर्भवती महिलांसाठी सुरक्षित मॉइश्चरायझर्स आणि फेस क्रीम.
- उदाहरण: “Earth Mama Organic Skin Care“ किंवा “Burt’s Bees Mama Bee Belly Butter“
- निप्पल क्रीम
- स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी.
- उदाहरण: “Lansinoh HPA Lanolin Nipple Cream“
👶 बाळासाठी आवश्यक वस्तू:
- नवजात बाळाचे कपडे
- झबले, मिटीन्स, कॅप्स इत्यादी.
- उदाहरण: “TuddyBuddy 100% Cotton Multi Color Tops/Rompers/Bodysuits for Baby Boy & Baby Girl”
- स्वॅडल ब्लँकेट्स
- बाळाला सुरक्षित आणि उबदार ठेवणारे स्वॅडल ब्लँकेट.
- उदाहरण: “SwaddleMe Original Swaddle“
- बाळाचे डायपर्स
- बाळाच्या हॅन्डलिंगसाठी आवश्यक.
- उदाहरण: “Pampers Swaddlers Diapers“
- बेबी वाइप्स
- बाळाच्या त्वचेवर सौम्य साफसफाईसाठी.
- उदाहरण: “Himalaya Nature Touch Water Baby Wipes”
- बेबी पावडर आणि तेल
- बाळासाठी पावडर आणि तेल.
- उदाहरण: “Himalaya Baby Powder“ किंवा “Parachute Advansed Baby Massage Oil for New Born“
🧑🤝🧑 सोबत असलेल्या व्यक्तीसाठी:
- पार्टनरसाठी पुस्तके
- गर्भवती महिलांच्या साथीदारांसाठी मार्गदर्शक पुस्तके.
- उदाहरण: “The Expectant Father: The Ultimate Guide for Dads-to-Be“