डायपर कसे वापरावे? बाळाच्या शी-शु व्यवस्थापनासाठी संपूर्ण मार्गदर्शक |The Ultimate guide for Diapering a Newborn Baby

आई बनलो कि सर्वात पहिले जी गोष्ट करायला लागते आणि अवघड वाटत असते ती म्हणजे बाळाची शी काढणे ,शु साफ करणे आणि ढुंगण धुणे .हो अगदी कितीही मोठं झालात तरी ह्या एका गोष्टीचा उद्धार आई कायम करते ती म्हणजे लहानपणी ढुंगणं धूतली आहेत तुमची म्हणून .त्यामुळे आई बाप झालो म्हणजे ढुंगण धुणं आलंच असं आपलं एक डोक्यात फिट्ट बसलेलं गणित हे असतंच .पण आता त्यात diaper ची साथ मिळालेली आहे .हो पण तरीही अजूनही हे एक प्रकरण आहेच .मग कसं कराल ???हे सारं???काळजी करू नका माझा ब्लॉग आहे ना तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला …..तर मग नक्कीच वाचा हे खास पोस्ट त्या सगळ्या newmoms साठी ज्यांना diaper बद्दल बरेच प्रश्न पडलेत .

This post talks about should we really use the diaper?? and which diaper to choose?? How to use the diaper? how to maintain cleaniliness and some useful tips . It also answers the question like”navjat balasathi diaper kase vaprave??”or ” kontya brand che diaper vaprave?” etc

बाळा झाल्यावर आई बनलो कि नवनवीन गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यातीलच बाळाची शुशी प्रकार. पण काळजी करू नका. आजकालच्या आयांसाठी diapers हा option उपलब्ध आहे .पण ह्या diaper बद्दल पण खूप साऱ्या शंका ह्या असतातच ..जसं कि लावू कि नये ???सोडवताना त्रासाचं जातं.किंवा diaper चांगली सवय आहे कि नाही ????अशा बऱ्याच शंका ह्या नवीन होऊ घातलेल्या आईच्या मनात असतातच ..

Table of content

सर्वात पाहिले बाळासाठी diaper वापरावं कि नाही? |Should we really use the diaper??

बाळ तासातून अनेकवेळा शु करते त्यामुळे लंगोट सतत ओले होतात. आणि ओलं लागलं कि बाळ रडतं आणि त्याची झोपमोड होते. सुरुवातीला बाळ हे दिवसातून दोन ते तीन तासच जागे असतं. बाकीवेळ झोपतं. आणि झोपेतच त्याची वाढ चांगली होते. तेव्हा त्याची सतत झोपमोड होऊ नये यासाठी diaper वापरणं गरजेचं आहे अस मला वाटतं. पण काही बाळांना त्वचा नाजूक असल्याने रॅश येऊ शकतात. तेव्हा काळ्जी घेणे गरजेचे आहे. आपण नीट काळजी घातली दार तीन ते चार तासांनी diaper बदललं तर बाळाला त्रास होणार नाही आणि बाळाची झोप नीट पूर्ण झाली कि त्याला देखील ते पोषक ठरेल .तुमचं बाळ देखील नीट अंग धरेल आणि बाळाची वाढ चांगली होईल.आजकाल डॉक्टर देखील बाळासाठी diaper वापरावयास सांगतात ज्याचा बाळांना नक्की फायदा होतो .

लक्षात घ्या शु झाली कि डायपर ते शोषून घेईल आणि बाळाची शी झाली कि आपण डायपर लगेच बदलणारच आहोत.त्यामुळे बाळाला त्रास होणार नाही .

Diaper कसे वापराल? | How to use diapers??

कोणते diaper? | which is the best diaper for your newborn baby??

नुकत्याच जन्म झालेल्या बाळासाठी newborn baby diaper मिळते. Pampers हा चांगला brand आहे. त्यांचे newborn diapers मिळतात ते नवीनच जन्म घेतलेल्या बाळासाठी वापरू शकता. नंतर बाळाच्या वजनानुसार diaper उपलब्ध असतात.

Diaper ची सुरुवात | How to start using diaper for baby ???

तुम्हाला जर बाळाला रॅश येण्याची भीती वाटत असेल. तर लगेचच diaper वापरण्याची घाई करू नका. काही दिवस गेले कि रात्री पासून सुरुवात करा. दर चार तासांनी रात्रीत diaper बदला. for example साधारण रात्री 10 वाजता वैगरे diaper लावले तर रात्री 2 च्या दरम्यान बाळ दूध प्यायला उठेल तेव्हा diaper बदला. एकदा तुम्हाला वाटू लागलं कि बाळाला सूट होतंय. कि मग दिवसाही diaper वापरू शकता.

काय काळजी घ्याल? | What care should be taken while using diapers??

  • Diaper वापरताना दिवसातून काही वेळ बाळाला उघडं ठेवा. म्हणजे त्याला मोकळं वाटेल. हवा लागेल. साधारण अंघोळीच्या आधी काही वेळ आणि संध्याकाळी कपडे बदलायच्या आधी काही वेळ मी त्याला थोडा वेळ उघडे ठेवते.
  • साधारण बाळाच्या इव्हनिंग routine चा भाग म्हणून जेव्हा त्याचे कपडे बदलतो तेव्हा खालचा भाग नीट पुसून, तिथे एखादं बाळांसाठीचं सूट होणारं nappy cream लावा.baby पावडर टाका. थोडावेळ जाऊदे मग diaper घाला. अशी काळजी घ्या.
  • सकाळी अंघोळीच्या वेळी तिथे तेलाचा मसाज हा होतोच.
  • सुरुवातीला काही दिवस अंघोळ झाल्या झाल्या लंगोटच घाला मग बाळाची शु झाली, कि मग diaper लावा. किंवा काही तासांनी लावा.
  • दर चार तासांनी diaper बदलणे गरजेचे आहे ह्याकडे नीट लक्ष द्या. भरले कि जड झालेले तुम्हाला जाणवेल. मग बदलून टाका. जरी कंपनीने 12 तासांचा वैगरे दावा केला असेल तरीही आपण वेळावेळाने बदलणे रास्त आहे.
  • जर काळजी घेऊनही रॅश येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • साधारण चांगल्या brand चे diapers वापरा.

बाळाची शु आणि बाळाची शी चे व्यवस्थापन | How to take care of potty clothes??

साधारण स्वछतेच्या point of view ने सांगते:

शु ची बादली/बकेट :

शु चे आणि इतर धुवायचे कपडे टाकण्यासाठी एक वेगळी बादली ठेवा. दिवसा बाळ जेव्हा शु करेल तेव्हा सारखे कपडे धुणे possible होत नाही. तेव्हा अशी एक वेगळी बादली ठेवा. बाळाची शुची दुपटी, लंगोट, झबली इतर त्यात ठेवू शकता. धुवायच्या वेळेस तासभर आधी डेटॉल व वॉशिंग पावडर मध्ये भिजवून धुवू शकता.

शी ची बादली/bucket :

शी चे कपड्यांची वेगळी बादली ठेवा. लगेच धुवून टाकण्यास सोपे जाईल अथवा लगेच जर जमणार नसेल तर पाणी घालून ठेवा.

Dipers डस्टबिन :

diapers टाकण्याची वेगळी डस्टबिन ठेवा. आणि शी चे diapers शक्यतो newspapers मध्ये wrap करुन डस्टबिनमध्ये टाका. diaper हे घातक कचऱ्यात येते .तेव्हा कचरा बाहेर टाकताना किंवा पालिकेच्या माणसाला देताना डायपर ची पिशवी किंवा डस्टबिन वेगळी दिलेली उत्तम .म्हणजे कोणतीही अडचण येत नाही .

Read More : बाळाला कसे झोपवाल???

Nappy change | बाळाची शी झाली कि diaper कसे बदलाल?

  1. बाळाला शी झाली कि, ड्रायमॅटवर अंथरलेल्या दुपट्यावर ठेवावं.
  2. Diaper अलगद काढून घ्यावं.
  3. बाळाचे दोन्ही पाय एका हातानी वर उचलून धरून Baby wipes नी कुल्ले स्वछ धुवावे. शीची जागा स्वच्छ करावी.
  4. नवीन diaper घालावे.
  5. शीचे wipes आणि diaper हे न्युजपपेरमध्ये wrap करुन डस्टबिनमध्ये टाकावेत.
newborn diaper guide

बाळासाठी डायपर कसे निवडाल ?? | How to select diaper for a baby ???

बाळाचे डायपर निवडताना त्याचा ब्रँड चांगला असला पाहिजे आणि बाळाच्या वजनानुसार ते मतच झाले पाहिजे ह्याचा विचार करणे गरजेचे आहे .तुम्ही संपले पॅक वापरून निवडू शकता पण माझ्या माहितीत pampers आणि mammy poco pants हे दोन चांगले ब्रँड आहेत .

लक्षात घ्या :बाळाचे दिवसातून किती diapers ओले भरलेले असतात. ते बाळाच्या हेअल्थचे इंडिकेशन आहे.दिवसातून बाळ कितीवेळा शु आणि शी करते ह्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ड्राय diapers ही काळजीची बाब आहे.त्वरित डॉक्टरांच्या कानावर घाला.

Note :प्रत्येकवेळेस diaper बदलेले कि साबणाने हात स्वच्छ धुवा म्हणजे तुम्हाला व बाळाला infection होणार नाही.

सुरुवातीला तुम्हाला एकटीने सगळं लगेच जमणार नाही. साहजिकच आई तुम्हाला मदत करेल. हळूहळू routine बसलं कि सगळं सोपे होइल. आणि तुम्ही nappy change मध्ये expert व्हाल. तेव्हा एकदा try करून बघा. All the best !!

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

🌟 बाळाच्या शी-शु साठी आवश्यक वस्तू (Essentials)

  1. डायपर (Diapers)
    • डिस्पोजेबल डायपर
    • पुन्हा वापरता येणारे कापडी डायपर
    • बायोडिग्रेडेबल व पर्यावरणपूरक पर्याय

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नवजात बाळाला किती वेळा डायपर बदलायला हवा?

नवजात बाळाचे दिवसातून 8 ते 12 वेळा डायपर बदलले जाऊ शकतात. प्रत्येक शी/शु नंतर डायपर त्वरित बदलावा, कारण ओलसरपणा बाळाच्या त्वचेला इजा करू शकतो.

डायपर रॅश टाळण्यासाठी काय करावे?

प्रत्येक डायपर बदलताना बाळाची त्वचा स्वच्छ कोरडी करावी. शक्य असल्यास काही वेळ डायपर न घालता हवेचा संपर्क द्यावा आणि नैसर्गिक रॅश क्रीम वापरावी.

डिस्पोजेबल डायपर चांगले की कापडी डायपर?

दोघांनाही फायदे आहेत. डिस्पोजेबल डायपर सोयीचे असतात, पण कापडी डायपर पर्यावरणपूरक व त्वचेसाठी सौम्य असतात. पालकांनी आपल्या गरजेनुसार निवड करावी.

डायपरचा सतत वापर बाळाच्या त्वचेस अपायकारक आहे का?

: योग्य ती काळजी घेतल्यास नाही. वेळेवर डायपर बदलणे, त्वचेची स्वच्छता राखणे व रॅशपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बाळाची शी किंवा शु सामान्य पेक्षा जास्त होत असल्यास काय करावे?

उत्तर: हे बाळाच्या आहारावर व वयानुसार बदलू शकते. परंतु फारच वारंवार शी/शु होत असल्यास किंवा त्यात रंग, गंध, रचना वेगळी वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळासाठी कोणत्या प्रकारचा वाइप्स सुरक्षित आहे?

सुगंधविरहीत, अल्कोहोल मुक्त व हायपोअ‍ॅलर्जेनिक वाइप्स वापरणे अधिक सुरक्षित आहे. नैसर्गिक घटक असलेले वाइप्स त्वचेस सौम्य असतात.

डायपर बदलण्यासाठी बाहेर जाताना काय तयारी असावी?

उत्तर: डायपर बॅगमध्ये अतिरिक्त डायपर, वाइप्स, चेंजिंग मॅट, कपडे व डायपर रॅश क्रीम असावेत. तसेच कचरा पिशवी व हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *