बाळंतिणीची काळजी, बाळाची मालिश आणि शेक शेगडी: घरगुती टिप्स व मार्गदर्शन| Step by Step guide to Postpartum Indian massage for New Mom

बाळंतिणीची-काळजी-बाळाची-मालिश-आणि-शेक-शेगडी-घरगुती-टिप्स-


Taking proper care of a new mother and her newborn baby is a vital part of postpartum recovery in Indian tradition. From gentle massages to warm compresses using the traditional shek shegdi, these age-old practices help in faster healing, relaxation, and bonding. This step-by-step guide covers essential aspects of postpartum care, including mother and baby massage routines, traditional heating techniques, and safety tips. This post also answers commonly asked questions like:

  • How to give a postpartum mother a warm compress using shek shegdi? (Balaantinichi shek shegdi kashi karavi?)
  • ow to give herbal smoke (dhuri) to a newborn baby? (Balala dhuri kashi dyavi?)
  • What precautions should be taken during baby massage? (Balala malish ghetana kay kalji ghyavi?)

बाळंतपण म्हटलं की एक गोष्ट अगदी ओघाने येतेच ती म्हणजे अंगलावणी, शेक शेगडी, धुरी आणि बरंच काही. सगळ्याच आयांना आपल्या लेकीची बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडत असतो . एकदा मी हॉस्टेलवर रहात असताना बरं नाही वाटत म्हणून आजीकडे गेले होते आणि तेव्हा आजी स्वतः शेक घेत होती आणि मला पाहून तिनं मलापण शेक घेण्यासाठी उभे केले. त्यादिवशी हॉस्टेलवर परतले तेव्हा माझ्या अंगाला बाळंतिणीसारखा वास येतोय असं माझ्या roomates मला म्हणू लागल्या. हो बाळंतपण म्हणजे हीच शेक शेगडी. आणि खरंच अतिशय important भाग ह्यासगळ्यातला. बरेचदा जुन्या प्रथा आपल्याला outdated वाटतात पण हि प्रथा किंवा पद्धत अजिबात outdated नाही बरं का ??बाईची होणारी शारीरिक झीज भरून काढण्यासाठी अतिशय गरजेची आणि महत्वाची आहे आणि असं आजच्या काळातील देखील बऱ्याच मुली आपल्याला सांगतील .जर शक्य असेल करणं तर नक्कीच आपण काळजी घ्यायला काय हरकत आहे ??

डिलीव्हरीनंतर शरीर हे अतिशय थकल्यासारखं होतं. अंगात वात जाणवू शकतो. अंगावर bleeding जात असतं. परत नॉर्मल झाला असाल तरी टाके हे असतातच. तेव्हा ही सगळी झिज भरून काढण्यासाठी ह्या मालीश आणि शेक ह्या गोष्टींची बाळंतिणीस गरज असते. बाळाला देखील चांगली वाढ आणि उत्तम आरोग्य ठेवण्यास ह्याची अतिशय मदत होते. तेव्हा ह्या साठीची काय तयारी असणं गरजेचे आहे ते पाहू. आणि हे म्हणजे नक्की काय? ते जाणून घेऊ.

बाळ आणि बाळंतिणीस अंगलावणी करण्यासाठी बाई ठेवणे जरुरीचे आहे. निदान पहिला सव्वा महिना बाळाच्या आईसाठीतरी.आणि बाळासाठी तुम्ही पुढे तुम्हाला जसं सोयीचे वाटेल तशी ठेवू शकता. ह्या बायका सध्या फार demand मध्ये आहेत. आणि हो त्या अतिशय छान पद्धतीने बाळाचे आणि आईचे मालिश करतात. बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी??

Table of Content:

त्यासाठीची काय आणि कशी तयारी कराल? | What to prepare for traditional indian postpartum massage for new mom??

लागणाऱ्या गोष्टी | Must haves for traditional indian postpartum massage

  • पॅराशूट खोबरेल तेल
  • डाळीचे पीठ
  • ओवाशोपा पावडर
  • कोळसा
  • घमेलं
  • कोळसा तापविण्यासाठीची जाळी
  • आईचा पोटपट्टा (शक्यतो कॉटनची वापरलेली मऊ साडी )
  • एक जुनी सतरंजी

आता अंगलावणी म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ?| How traditional indian massage is carried exactly??

Read More : बाळाची मालिश आणि धुरी

आई साठीची अंगलावणी | Indian postpartum massage for mom

ह्यात आईच्या अंगाचे मालिश, मग तिची अंघोळ, त्यानंतर शेक आणि मग पोटपट्टा ह्या गोष्टी include आहेत.

मालिश | massage routine for new mom

  • मालिश :
    • आईचे थकलेले अंग आणि स्नायु ह्यांना मसाज करुन आराम देण्याचा प्रयत्न ह्यात केलेला असतो. खास करून कंबर ही पुन्हा पहिल्यासारखी भक्कम करणं जरुरीचे असते. तेव्हा साधारण आई ला कोमट खोबरेल तेलाने मसाज करतात. संपूर्ण अंग रगडून देतात. आणि खरंच घ्या. कारण तुम्हालादेखील बरं वाटेल.
    • मला सतरंजीवर आडवे करुन त्या बाई आधी कोमट तेलाने मसाज करत.त्यात दोन्ही हात, पाय, खांदे, मांड्या, पोट आणि मुख्य म्हणजे पाठ आणि कंबर मालिश करून दिले जाई.
    • छाती मळून दिली जाते. बाळ अंगावर दूध पिते आणि सुरुवातीला त्याला संपूर्ण दूध ओढता येत नाही तेव्हा तुमच्या स्तनांमध्ये दुधाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे ह्या बायका छाती चोळून उरलेलं दूध काढून टाकतात. त्यामुळे गाठी होत नाहीत. परत दुधाचा पान्हा नीट फुटण्यासाठी, दुधाच्या शिरा मोकळ्या होण्यासाठी छाती मळून घेणे गरजेचे आहे. निप्पल्सला देखील त्या बाई बाळाला दूध नीट ओढता यावं ह्या दृष्टीने मसाज करतात. हा आईच्या अंग मालिश मधील महत्वाचा भाग आहे. ह्याकडे नीट लक्ष द्या.
    • नंतर माझ्यासाठी येणाऱ्या बाई डाळीचे पीठ त्यात दूधसाय घालून त्याचा हात मसाज झाल्यावर परत फिरवायच्या ज्याने डबल मालिश होत असे.

अंघोळ | Bathing a new mom

  • अंघोळ :
    • आईची अंघोळ ही कडकडीत गरम पाण्याने घातली जाते. ज्याने अंग चांगलं शेकून निघेल. खासकरून आईच्या पाठीवर आणि कंबरेवर कडकडीत पाणी घातले जाते, ज्यामुळे तेथील भागाला आराम मिळेल.
    • गरम पाण्याने टाके देखील शेकवले जातात. ज्याने टाक्यांना आराम मिळतो आणि दुखणं कमी होतं.
    • बाकी अंघोळ करताना खासकरून तुमची छाती आणि निप्पल्स साबण लावून स्वछ रोज धुवा कारण बाळ अंगावर दूध पित असल्याने तो भाग रोज स्वछ ठेवणे गरजेचे आहे म्हणजे बाळाला infection होणारं नाही. पुढेदेखील ही सवय continue ठेवाल.

शेक /धुरी | shek shegdi routine for new mom

  • शेक /धुरी :
    • पूर्वी बाळंतिणीस खाटेवर झोपवून खालून पाठ वैगरे शेकवायची पद्धत होती. पण माझ्यावेळेस घमेल्यातील तापवलेल्या कोळशावर उभे करून मला शेक दिला गेला.
    • दोन पायांच्या मध्ये घमेलं ठेवून व त्यात साधारण तापलेले कोळसे ठेवण्यात येत.व साधारण अंगाच्या खालील भागाला शेक दिला जाई. जेणेकरून तेथील टाके लवकर भरून निघतील आणि वात अंगात शिरणार नाही मोकळा होऊन जाईल.
    • तापलेल्या निखाऱ्यात बाळंतशोपा पावडर घातली जाते ज्याने औषधी धुरी आपणास मिळते. खालील अंग नीट शेकवून घ्या.
    • छाती बसून शेकवून घ्या, जेणेकरून सर्दी खोकला तुम्हाला होणारं नाही व तुमचे आरोग्य चांगले राहील. हात,पायाचे तळवे शेकवा. आणि थोडीशी नाका तोंडात देखील धुरी घ्या. आराम मिळेल आणि infection पासून दूर राहाल.

पोटपट्टा | Indian traditional postpartum belly belt

  • पोटपट्टा :
    • प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले पोट एकदम कमी होत नाही. ते कमी करण्यासाठी आपल्याकडे पोटपट्टा बांधायची पद्धत आहे.
    • मी देखील पहिले दीड महिना पोटपट्टा बांधून घेतला आणि मला ह्याचा चांगला अनुभव आला.
    • अंगालावणी करणाऱ्या बायका साधारण वापरलेल्या कॉटनच्या साडीचा पोटपट्टा बांधतात. धुरी झाल्यानंतर हा पोटपट्टा बांधला जातो. साधारण पहिले काही तास ठेवावा. मग जेवणाच्यावेळेस सैल करून काढून ठेवला तरी चालतो. तुम्हाला झेपेल तेवढा वेळ घ्या. तुम्हाला नक्की फायदा होइल.

आईसाठी अंगालावणीची सर्व घटकांचे एकत्रित फायदे (Combined Benefits of Full Postpartum Care for New Mom):

  1. पूर्ण शरीराची विश्रांती व पुनर्बल मिळते:
    मालिश, अंघोळ, शेक आणि पोटपट्टा यामुळे आईच्या शरीराला संपूर्ण विश्रांती मिळते आणि प्रसूतीनंतरचे थकवा दूर होतो.
  2. कंबर आणि पाठ मजबूत होतात:
    मालिश आणि गरम पाण्याच्या अंघोळीमुळे पाठीचे व कंबरेचे स्नायू पुन्हा भक्कम होतात, त्यामुळे पुढे पाठदुखी किंवा कंबरदुखी होण्याचा धोका कमी होतो.
  3. रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची जखम जलद भरते:
    गरम तेलाची मालिश आणि शेक यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि शरीरातील टाके व इतर जखमा लवकर भरतात.
  4. स्तनांची निगा राखली जाते आणि गाठी टाळल्या जातात:
    छातीचा मालिश केल्याने दुधाच्या गाठी होत नाहीत व बाळाला योग्य पद्धतीने दूध मिळते.
  5. त्वचा आणि शरीराचा पोत सुधारतो:
    डाळीच्या पिठाने घासल्यामुळे त्वचेत गंध व मऊपणा येतो, मृत त्वचा निघते आणि त्वचा उजळते.
  6. वात नष्ट होतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो:
    शेक आणि औषधी धुरीमुळे शरीरातील वात मोकळा होतो आणि सर्दी-खोकला व संसर्गापासून संरक्षण मिळते.
  7. पोटावर ताण येऊन पोट लवकर पूर्ववत होते:
    पोटपट्टा बांधल्यामुळे सैल झालेल्या स्नायूंना आधार मिळतो व पोट घटून येते.
  8. हार्मोनल समतोल आणि मानसिक स्वास्थ्य टिकते:
    मालिश आणि उबदार अंघोळ यामुळे तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहते आणि हार्मोनल बदल सहजतेने हाताळले जातात.
  9. झोप सुधारते व थकवा दूर होतो:
    नियमित अंगालावणीमुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळते, त्यामुळे बाळंतिणीला चांगली झोप लागते.
  10. प्रसंगानुसार (जसे कोविड काळात) स्वयंपूर्ण काळजी घेणे शक्य होते:
    स्वतः मसाज, शेक आणि योग्य पद्धतीने अंघोळ घेऊन बाळंतिणीची काळजी घेता येते, जसे की कोरोनाच्या काळात सांगितले आहे.

Corona मध्ये कसे कराल म्हणजे बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी?? | How to carry postpartum massage during covid??

  • कोरोनामधील दिवसात अशी बाई ठेवणे शक्य नसल्यास तुमच्या आई कडून किंवा कोणाकडून अंगाला साधारण मसाज करून घ्या. अगदी प्रोफेशनल नाही जमला तरी शरीराला थोडा आराम मिळेल.
  • स्वतःची स्वतः छाती मळून घ्या. अंघोळीच्या आधी स्वतः दाबून दूध मोकळं करा. तुमचं तुमचं निप्पल्सना ओढून सरळ करा. म्हणजे दुधाच्या गाठी होणार नाहीत आणि निप्पल्सची बाळाला दूध ओढण्यासाठी टोके पुढे येतील.
  • अंघोळ वर सांगितल्यानुसार तुम्ही आई बहिणीच्या मदतीने पहिले काही दिवस, मग टाके जरा सुटले कि स्वतःची स्वतः easily करू शकता. फक्त गरम गरम पाण्यानी कंबर आणि पाठ शेकवणं गरजेचे आहे.
  • वर सांगितल्या नुसार धुरी घेणं सोपे आहे. घरातील बायकांच्या मदतीने घेऊ शकता.
  • पोटपट्टा readymade वापरू शकता.

Note:एरवीदेखील अंगलावणी करणाऱ्या बाईंना आधी डेटॉलने हात स्वच्छ धुऊन सुरुवात करायला सांगा. आजकाल बऱ्याच बायका आपणुन दक्ष असतातच. तरीदेखील सांगावेसे वाटले.

ही झाली आईची अंगलावणी. बाळासाठीची देखील महत्वाची आहे ती पुढील पोस्ट मध्ये पाहू.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

❗ अस्वीकरण (Disclaimer):

वरील माहिती केवळ शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी दिली आहे. ही वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही. कोणतीही आयुर्वेदिक किंवा मसाज पद्धती अमलात आणण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
प्रत्येक स्त्रीचा प्रसूतीनंतरचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे इथे दिलेली माहिती सर्वांवर लागू होईलच असे नाही.

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

👶 बाळासाठी आवश्यक वस्तू:

  1. नवजात बाळाचे कपडे
  2. स्वॅडल ब्लँकेट्स
    • बाळाला सुरक्षित आणि उबदार ठेवणारे स्वॅडल ब्लँकेट.
  3. बाळाचे डायपर्स
  4. बेबी वाइप्स
  5. बेबी पावडर आणि तेल

👶 प्रसूती आणि मॅटर्निटी आवश्यक वस्तू:

🤱 डिलिवरीनंतर आईंसाठी पारंपरिक भारतीय मसाज – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. डिलिवरीनंतरचा मसाज म्हणजे काय?

डिलिवरीनंतरचा मसाज म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक अभ्यंग, ज्यामध्ये गरम औषधी तेलांचा वापर करून संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. यामुळे आईच्या शरीराची पुनर्बांधणी, आराम आणि मानसिक स्थैर्य मिळते

2. डिलिवरीनंतर मसाज कधी सुरू करावा?

नैसर्गिक प्रसूतीनंतर: ५ ते १० दिवसांनी मसाज सुरू करता येतो.

सिझेरियन (C-section) नंतर: टाके पूर्णपणे बरे झाल्यावर, डॉक्टरांचा सल्ला घेऊन मसाज सुरू करावा.

3. पोस्ट डिलिवरी मसाज किती दिवस करावा?

पारंपरिक पद्धतीनुसार ४० दिवस रोज मसाज केल्यास उत्तम. हा काळ “सुतिका काल” म्हणून ओळखला जातो.

4. डिलिवरीनंतर मसाजचे फायदे काय आहेत?

शरीरदुखी व स्नायू ताण कमी होतो

रक्ताभिसरण सुधारते

गर्भाशय आपली मूळ स्थिती पुन्हा प्राप्त करतो

हॉर्मोनल समतोल साधतो

स्तनपानास मदत होते

झोप सुधारते

वजन व शरीरयष्टी नियंत्रित ठेवतो

5. सिझेरियन नंतर मसाज सुरक्षित आहे का?

हो, पण फक्त जखम पूर्ण बरी झाल्यावरच मसाज करावा आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच. टाके असलेल्या भागावर मसाज टाळा.

6.डिलिवरीनंतरचा मसाज डिप्रेशन कमी करू शकतो का?

हो, कारण मसाजमुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि “एंडॉर्फिन” नावाचे आनंददायी हार्मोन वाढतात. यामुळे मानसिक शांतता मिळते.

7.डिलिवरीनंतर मसाज कोण करतं?

पारंपरिकरित्या “मालिशवाली” किंवा “जापा बाई” या अनुभव असलेल्या महिला घरी येऊन मसाज करतात.

8.मसाज करताना कोणती काळजी घ्यावी?

अनुभवी स्त्रीकडूनच मसाज घ्यावा

खूप जोराचा दाब देणारा मसाज टाळावा

हानिकारक सुगंधी तेलांपासून दूर राहा (विशेषतः स्तनपान करत असताना)

ताप, जखम किंवा थकवा असल्यास मसाज टाळा

9.प्रोफेशनल उपलब्ध नसल्यास स्वतः मसाज करू शकतो का?

हो, सौम्य उबदार तेल वापरून स्वतः हात-पाय किंवा पोटावर सौम्य रगडून मसाज करू शकता. पण कोणतीही वेदना किंवा त्रास असल्यास थांबवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *