प्रेग्नन्सीसाठी डॉक्टर निवडणे अतिशय गरजेचे आहे.तुम्ही जर प्रेग्नन्ट आहात असं वाटत असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .मग प्रेग्नन्सीसाठी डॉक्टर ची निवड कशी कराल ???मी काय विचार केला ??मला कोणता फायदा झाला ??त्यातून मला काय कळले हे थोडक्यात तुमच्यासाठी !!!!!!!!
This article explains how to find the best pregnancy doctor or gynecologist for your needs. It covers all the important things to consider while choosing a pregnancy specialist — including experience, comfort, location, and personal care. Whether you’re searching for a pregnancy sathi doctor or pregnancy sathi gynecologist in Marathi, this guide answers all your questions. If you’re pregnant or planning to be, this is a must-read post to help you make the right choice!
Table of content
तुमची प्रेग्नेंसी हे काही आजारपण नाही. ही एक अवस्था आहे ज्यातून नीट पार पडल्यावर तुम्ही आई होणार आहात. ही कोणतीही भयावह स्थिती नाही किंवा घाबरून जायचं कारण नाही. किंबहुना तुमचं शरीर अतिशय योग्य प्रकारे कार्यरत आहे व तुमचं स्त्रीत्व हळुवार आणखी खुलवत आहे.
पण हा नऊ महिन्यांचा प्रवास नीट पार पाडण्यासाठी एका योग्य मार्गदर्शकाची गरज असते व तो मार्गदर्शक हा तुमचा डॉक्टर असतो.
मग या प्रेग्नन्सीसाठी डॉक्टर निवड कशी करावी? | Finding best pregnancy doctor
पुढील नऊ महिन्यात ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील महत्वाची भूमिका पार पडणार आहे. गर्भ रुजल्यापासून त्याची नीट होणारी वाढ, त्यासाठीची पोषक औषधं ते तुमची प्रसूतीतून सहीसलामत सुटका ही जवाबदारी डॉक्टरच पार पाडत असतात.
तुम्ही किती comfortable आहात ?? | Patient’s Comfort level to doctor
- तेव्हा तुम्ही स्वतः म्हणजे होणाऱ्या बाळाची आई त्या व्यक्तीबरोबर comfortable असणे हे सर्वाधिक गरजेचे आहे. तुम्ही खुल्यामनाने तुम्हाला पडणारे प्रश्न विचारू शकता व त्याचे योग्यप्रकारे निरसन होत आहे ह्याची तुम्हाला खात्री असणे गरजेचे.
प्रेग्नन्सीसाठी डॉक्टर किती अनुभवी आहेत ?? | Doctor’s experience matters.
- तुमचे डॉक्टर नामांकित असणे जेवढे तुम्हाला गरजेचे वाटते त्याचबरोबरीने त्यांचा अनुभव व त्यांची निदान आणि उपचार पद्धती तुम्हाला अनुकूल असणे गरजेचे आहे. ह्याचे उदाहरण देताना मला माझा अनुभव शेअर करायला आवडेल. मी जेव्हा माझ्यावेळी दोन डॉक्टर्सना भेटले, तेव्हा दोन्ही डॉक्टर्स नामांकित व तज्ज्ञ नक्कीच होते पण त्यातील एकाने आपला फास्ट अप्रोच दाखवत लगेचच बऱ्याच टेस्ट, अनेक औषधे अशा गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याचा अँप्रोच चुकीचा होता असं नाही पण मला तो सूट न होता माझ्या मनात भीती किंवा सांशकता निर्माण झाली. हेच मी जेव्हा दुसऱ्या डॉक्टर कडे गेले तेव्हा त्यांनी लगेच अचूक निदान करत, लगेचच भारंभार टेस्ट न सांगता गरजेइतकीच औषधे देत मला दिलासा दिला तेव्हाच हा डॉक्टर माझ्यासाठी योग्य आहे अशी माझी खात्री झाली.
डॉक्टर जवळ आहेत काय ??| Distance to clinic
- ह्या बाबतीत आणखी एक गोष्ट मला नोट करावीशी वाटते ते म्हणजे डिस्टन्स. शक्यतो डॉक्टर हा तुमच्या जवळचा असावा. जसं की माझ्याबाबतीत प्रसूती वेदनांची सुरुवात झाल्यावर दहा मिनिटात आम्ही हॉस्पिटल मध्ये पोहोचलो व एरवीदेखील अपॉइंटमेंटसाठी खूप प्रवास करून जाणे शक्यतो टाळावे. ज्यांना ही गोष्ट पॉसिबल आहे त्यांना ही काळजी घेण्यास हरकत नाही.
प्रेग्नन्सीसाठी डॉक्टरांची काय प्रोसेस असते ?? | Normal Pregnancy routine checkup by doctor
मी माझ्या डॉक्टरांची निवड पक्की केल्यानंतर माझी तिथेच ट्रीटमेंट चालू झाली. खरंतर ही ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा हेल्थ चेकअप्सच असतात. टाइम टु टाइम डॉक्टर आपल्याला बोलावून गर्भातील बाळाची नीट वाढ होत आहे ना ह्याची तपासणी करतात व त्याबरोबर आईची प्रकृतीदेखील तपासली जाते. कोणत्या गोष्टीची कमतरता किंवा बदल जाणवत असेल तर त्यावर उपचार अवलंबले जातात. बहुतांश स्त्रियांना iron आणि calciumच्या गोळ्यांचा कोर्स एका ठराविक महिन्यापासून बाळ झाल्यानंतर साधारण काही दिवस चालूच राहतो. त्याबरोबर ठराविक कालावधीत होण्याऱ्या सोनोग्राफी, ब्लड शुगर टेस्ट, बीपी चेकअप, इतर गव्हर्नमेंट अनिवार्य टेस्ट ह्यासारख्या चाचण्या डॉक्टर करतात. ह्याकाळात तुमची केसपेपर फाईल ही तुमच्याबरोबर दर अपॉइंटमेंटला घेऊन जाणे गरजेचे असते ज्यात तुमचे सगळे रिपोर्ट्स आणि प्रेस्क्रिपशन्स एका ठिकाणी ठेवलेले असतात.
माझा अनुभव | My experience about finding pregnancy doctor
डॉक्टर हा नुसत्या औषधोपचारापलीकडे जाऊन आपल योग्य कॉऊन्सलिंगदेखील करतो. आपल्या शंका कुशंकाच निरसनदेखील करतो.
माझ्यावेळी मला होणारा कफ, ऍसिडिटी, उलट्या ह्यावर डॉक्टरांकडे वारंवार चौकशी करायचे तेव्हा असं होणारच थोडंसं अंगावर काढ म्हणत विनाकारण कोणतीही औषधं देत नसत. मला मधील काहीदिवस एका पायास मुंग्या आल्यासारखं होई तेव्हा असं तुला काही दिवस होईल हे त्यांनी मला आधीच सांगून टाकलं. बीपीच्याबाबतीतपण त्यांनी ठराविक महिन्याच्या चेकअपनंतर आता वाढणार नाही, इतकेच राहील हा दिलासा लगेच दिला. शेवटच्या काही महिन्यात नॉर्मल डिलिव्हरीसाठीची पोझिशन बाळ पकडतंय तेव्हा थोडंसं बसून काम केलंस तरी तुझे नॉर्मलचे चान्सेस वाढतील असा सल्ला दिला मग मी पण मनावर घेऊन माझेमाझे अंघोळीनंतर चार कपडे धुणं अर्थात स्वतःला जपत , वाकून भांडी लावणं अशी कामं व्यायाम म्हणून चालू केली. हा सल्ला डॉक्टर तुमच्या प्रकृतीनुसार देतील व ह्याबाबतीत डॉक्टरचे ऐकणेंच महत्वाचे. बरेचदा ह्या दिवसात काही नको अशा चर्चा देखील आपल्या कानावर पडतात जसं की माझ्यावेळेस पोट कमीच आले आहे वैगरे असं आजूबाजूच्या बायकांना बोलताना मी ऐकत असे. आणि न राहवून मी डॉक्टर कडे ह्याची विचारणा केली असता “चिक्कार पोट आहे, कुणाचं ऐकू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव “असं उत्तर त्यांनी मला दिलं आणि खरंच माझं बाळ हे तीन किलोपेक्षा वजनाने जास्तच भरलं. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा डॉक्टर हा तुमचा महत्वाचा मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचा सल्ला अंतिम. इतर पथ्यपाणी घरातील किंवा जवळच्या अनुभवी बायकांच्या सांगण्यावरून चालू ठेवण्यास हरकत नाही.
Read More : प्रेग्नन्सी केगल व्यायाम
नॉर्मल कि सिझेरिअन ?? | Normal Delivery or C-section??
डॉक्टरची दुसरी महत्वाची जवाबदारी असते ती म्हणजे तुमची होणारी डिलिव्हरी. डिलिव्हरी किंवा प्रसूती म्हणजे आईची व बाळाची सहीसलामत सुटका. डिलिव्हरी कोणत्याही प्रकारची असो नॉर्मल किंवा सिझेरियन त्यात होणाऱ्या वेदनातून जाणे तुम्हाला भागच आहे. पण तरीही नॉर्मल डिलिव्हरीवर भर देणारे किंवा ह्याबतीत अतिशय अनुभवाने संपन्न, परिस्थितीनुसार गोष्टी काळजीपूर्वक हाताळणारे विश्वसार्ह डॉक्टर असणे देखील खूप गरजेचे आहे.
काही महत्वाचे | Few things to remember
शेवटच्या महिन्यात डॉक्टर तुम्हाला ह्या संबंधित सर्व ऑपशन्सची पूर्ण कल्पना देतील. Painless डिलिव्हरीपासून, stem cell preservation ह्यांसारख्या बऱ्याच गोष्टी डॉक्टर तुमच्यासोबत डिसकस करतील. तुमच्या शेवटच्या महिन्यातील सोनोग्राफी रिपोर्ट्स व चेकअप ह्यावर तुमच्या डिलिव्हरी डेटची साधारण कल्पना देतील.
प्रत्येक अपॉइंटमेंटला तुम्ही व तुमचा जोडीदार म्हणजे बाळाची होणारी आई तसेच बाळाचे होणारे बाबादेखील असणे महत्वाचे. हा रुल माझ्या प्रेग्नेंसीमध्ये मी व माझ्या जोडीदाराने शंभर टक्के फॉलो केला.प्रेग्नेंसी कन्फॉरमेशन पासून डिलिव्हरीपर्यंत एकही अपॉइंटमेंट अशी नव्हती जी श्रीने मिस केली. तुम्ही आई जरी होणार असलात तरी तुम्हाला होणारे बाळ ही जवाबदारी दोघांचीही आहे. तेव्हा तुम्ही दोघे जेवढे एकत्रितपणे ह्या गोष्टी एन्जॉय कराल, हो अगदी डॉक्टरच्या अँपॉईंटमेंट्स, टेस्ट व सोनोग्राफीदेखील तेवढा हा प्रवास आनंदी, सुलभ व यशस्वी असेल.
तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!
अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
Healthline. (2021). How to choose the right gynecologist.
Banner Health. (n.d.). Top tips for choosing the right gynecologist.
पालकत्वाशी संबंधित वस्तूंसाठी खास शिफारस! 👶🍼
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

📖 प्रेग्नंसी जर्नल / प्लॅनर (Pregnancy Journal / Planner)
तुमच्या खास 9 महिन्यांच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची नोंद ठेवण्यासाठी हा प्लॅनर उपयोगी ठरतो. आठवड्याने अपडेट्स, भावनांचे नोंदी, आणि वैद्यकीय तपासण्यांचं आयोजन एका ठिकाणी.
शिफारस: आठवड्याला एक वेळ अपडेट करा आणि आठवणी संजोवून ठेवा.

📘 What to Expect When You’re Expecting – प्रेग्नन्सीतील तुमचा विश्वासू मार्गदर्शक!
गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय घडतं, काय अपेक्षित असतं आणि तुम्हाला काय करायला हवं – हे सर्व या पुस्तकात अगदी स्पष्ट, सविस्तर आणि काळजीपूर्वक सांगितलं आहे. शारीरिक बदलांपासून ते भावनिक उतार-चढाव, डॉक्टर अपॉइंटमेंट्सपासून ते बाळाच्या आगमनापर्यंतचा प्रवास सहज समजेल अशा भाषेत मांडलेला आहे. नव्या आई-बाबांसाठी हे पुस्तक एक गाईडप्रमाणे काम करतं.
शिफारस: गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच हे पुस्तक वाचायला सुरुवात करा.

👜 Doctor Visit Bag – रिपोर्ट्स, फाईल्स आणि वॉटर बॉटलसाठी परफेक्ट!
प्रेग्नन्सीच्या प्रत्येक डॉक्टर भेटीसाठी तुम्हाला लागतात – मेडिकल फाईल्स, सोनोग्राफी रिपोर्ट्स, पाण्याची बाटली, वॉलेट, छोट्या गरजेच्या वस्तू… आणि हे सगळं नीट ठेवण्यासाठी ही PALAY® कॉरडरॉय टोट बॅग आमची खास शिफारस आहे!
✅ या बॅगेची शिफारस का करतो:
- 📁 मेडिकल फाईल्स, रिपोर्ट्स व्यवस्थित मावतात
- 🍼 पाण्याची बाटली, स्नॅक्स, वैयक्तिक वस्तूंसाठी भरपूर जागा
- 📱 मोबाईल व डॉक्टर चिठ्ठ्यांसाठी इनर पॉकेट
- 👜 सोपं, हलकं वजन आणि अत्यंत स्टायलिश लूक
काही शंका आहेत का? आम्ही आहोत ना! |FAQ
1: How do I choose the right maternity doctor?
Answer (English):
Look for a doctor who specializes in obstetrics, has good patient reviews, is affiliated with a reputed hospital, and communicates well. You should feel comfortable and confident with them throughout your pregnancy journey.
उत्तर (मराठी):
जो डॉक्टर obstetrics मध्ये तज्ज्ञ आहे, ज्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत, जे नामांकित हॉस्पिटलशी संलग्न आहेत आणि पेशंटसोबत चांगला संवाद साधतात – असा डॉक्टर निवडावा. प्रेग्नन्सी दरम्यान तुम्हाला त्यांच्या सोबत आरामदायक वाटायला हवं.
Q2: Should I prefer a female doctor for my pregnancy?
Answer (English):
It’s a personal choice. Many women feel more at ease sharing personal concerns with a female doctor, but what truly matters is trust and comfort, regardless of gender.
उत्तर (मराठी):
ही वैयक्तिक पसंती असते. अनेक महिलांना महिला डॉक्टरकडे वैयक्तिक गोष्टी शेअर करणं अधिक सोयीचं वाटतं. मात्र डॉक्टरचे लिंग नव्हे, तर विश्वास आणि तुमचा आराम महत्त्वाचा असतो.
Q3: Is it okay to change my doctor during pregnancy?
Answer (English):
Yes, if you feel discomfort, lack of trust, or need better support, it’s okay to switch to a doctor who better understands your needs.
उत्तर (मराठी):
हो, तुम्हाला गैरसोय, अविश्वास वाटत असेल किंवा जास्त सहकार्य हवं असेल, तर डॉक्टर बदलणं योग्य आहे – तुमच्या गरजा समजणारा डॉक्टर महत्त्वाचा असतो.
Q4: How important are hospital facilities when choosing a doctor?
Answer (English):
Very important. A doctor associated with a well-equipped hospital ensures better care during delivery, emergencies, and advanced treatments if required.
उत्तर (मराठी):
फार महत्त्वाचं आहे. एक चांगल्या सुविधांनी सज्ज हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रसूतीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक चांगली काळजी घेऊ शकतो.
Q5: Can I take a second opinion from another doctor?
Answer (English):
Absolutely. If you’re unsure or need clarity on a diagnosis or treatment plan, taking a second opinion is smart and completely acceptable.
उत्तर (मराठी):अर्थात. जर तुम्हाला सध्याच्या निदानावर शंका असेल किंवा अधिक स्पष्टता हवी असेल, तर दुसरा मत घेणं योग्य आणि स्वीकारार्ह आहे.