बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Marathi Guide to breastfeeding
आई झालात, डिलीव्हरी पार पडलीये, गोंडस बाळ बघायला बरं वाटत असेल. एका मोठ्या exam मधून पार पडलात. पण आता एक गोष्ट नवीन असेल. ती म्हणजे breastfeeding. पूर्वी बाळ झालं म्हणजे ओघाने चालून आलेली गोष्टी. बऱ्याच बायकांना सर्रास लोकल ट्रेन मध्ये कोपऱ्यात बसून करतांना पाहिलं असेल. त्यामुळे फार काय जमून जाईल किंवा तितका विचारही मनात आला नसेल. पण आता करताना जरा नवीन आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे असं वाटत असेल. त्यातून दूध आलं का? कधी येईल? वैगरे असे प्रश्न आसपासच्या बायकामुळे आपल्याला पडत असतील.